आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • BJP Sena Alliance In Aurangabad Corporation Election Said Raosaheb Danave

औरंगाबाद मनपा निवडणूक : डेडलाइन संपली तरी युती करणार : दानवे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना-भाजप युती तुटण्याची चर्चा असली तरी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी मात्र युती होणारच, असा दावा केला आहे. दोन दिवसांपासून बंगळुरूत होतो. आता मुंबईत परतलो असून, पुन्हा चर्चा करणार असल्याचे दानवे यांनी सांगितले.

दानवे यांनी ४ एप्रिलपर्यंत युती होईल असे म्हटले होते. ही डेडलाइन उलटून गेली होती. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी दोन दिवस शिल्लक असतानाच युतीबाबत चित्र स्पष्ट होत नव्हते. गुलमंडी तसेच इतर काही जागांवर वाद असल्यामुळे युती तुटणार का, याबाबत विचारले असता हा वाद मिटवण्यात येत असून युती होईलच, यावर दानवेंनी जोर दिला.

पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी समांतर योजनेवर टीका केली होती. यावर दानवे म्हणाले, शहराला पाणी मिळाले पाहिजे ही भाजपची भूमिका आहे. या विषयावर औरंगाबादमध्ये आल्यानंतर सांगू. लोणीकरांच्या टीकेवर बोलण्यास मात्र त्यांनी नकार दिला.