आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • BJP, Shiv Sena Alliance Latest News In Divya Marathi

ठाकरेंच्या लालसेपोटीच युती तुटली, विहिंपचे केंद्रीय मंत्री प्रा. व्यंकटेश आबदेव यांची टीका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री होण्याच्या लालसेपोटीच युती तुटली. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर 25 वर्षांपूर्वी झालेली युती सत्तेच्या लालसेपोटी तुटणे ही दुर्दैवी बाब आहे, अशी टीका विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय मंत्री व्यंकटेश आबदेव यांनी व्यक्त केले. रविवारी औरंगाबादच्या दौ-यावर असताना त्यांनी "दिव्य मराठी'शी बातचीत केली.

भाजप आणि शिवसेनेला केवळ हिंदुत्वामुळे शक्ती प्राप्त झाली होती. मात्र ही युती तुटल्याने महाराष्ट्रातील मतदार काही प्रमाणात संभ्रमित झाला आहे. यात तरुणांचे प्रमाण अधिक आहे. मात्र राज्यातील हिंदू तरुण अभ्यासू आणि सुज्ञ आहेत. ज्याप्रमाणे सगळे हिंदू लोकसभा निवडणुकीच्या वेळी नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे होते, त्याचप्रमाणे या निवडणुकीतही ते मोदींनाच साथ देतील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.देशातील लव्ह जिहादबाबत आबदेव यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, हिंदू मुलींना पळवून त्यांच्याशी लग्न करून त्यांना मुस्लिम धर्म स्वीकारायला लावले जाते. मात्र मुस्लिम तरुणाने प्रेमात हिंदू धर्म स्वीकारल्याचे उदाहरण दिसत नाही. हा केवळ धर्मांतर करण्याचा प्रकार आहे, असा आरोपहीत्यांनी केला. या वेळी भगवान महाराज आनंदगडकर, संजयआप्पा बारगजे, अनिलदास महाराज, रसिका देशमुख, अखिल वकील, श्रीपाद पदे यांची उपस्थिती होती.
कोणीही समजून घेण्याच्या भूमिकेत नव्हते
ही गोष्ट हिंदूंच्या हिताची नसून "एमआयएम' सारख्या शक्तींना त्यांचा फायदा होऊ शकतो. महायुती तुटण्यावेळी विश्व हिंदू परिषदेने बघ्याची भूमिका न घेता दोन्ही पक्षांतील नेत्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला होता. मात्र खुर्चीच्या मोहापोटी कोणीही समजून घेण्याच्या भूमिकेत नव्हते, असेही आबदेव यांनी सांगितले.