आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संभ्रमित शिवसेनेच्या अडचणीत भर टाकण्याची भाजपची रणनीती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - समांतर जलवाहिनीवरून संभ्रमित शिवसेनेची आणखी कोंडी करण्यासाठी आणि प्रशासनाने ३० जूनच्या आत सभा घेण्याबाबत न्यायालयाला कळवण्याची तयारी चालवली असताना भाजपने आज आपल्या चाार स्थायी समिती सदस्यांच्या सहीने समांतर योजनेबाबत निर्णय घेण्यासाठी विशेष सर्वसाधारण सभा बोलावण्याची मागणी करणारे पत्र दिले आहे. शिवसेनेला पहिल्या दिवसापासून अडचणीची ठरलेल्या समांतरवरून सतत राजकीय कोंडीचाच सामना करावा लागेत आहे. न्यायालय सरकारच्या आदेशानुसार कंपनीला नोटीस पाठवून मनपाने त्यांच्या उत्तरानंतर सर्वसाधारण सभेने काय तो निर्णय घ्यायचा आहे. मनपा प्रशासनाने समांतर राहाणार असेल तर काय होऊ शकते समांतर नको असेल तर काय परिणाम होऊ शकतात यावर सविस्तर टिपणे तयार केली आहेत. मनपा प्रशासन लवकरच महापौरांना पत्र लिहून विशेष सर्वसाधारण सभा बोलावण्याची विनंती करणाार आहे. शिवाय तिकडे न्यायालयातही ३० जूनच्या आत सभा घेण्यात येणार असल्याचे कळवण्यात येणार असल्याचे आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी सांगितले.
तिकडे शिवसेनेत मात्र संभ्रमाचे वातावरण आहे. समांतर योजनेवर कोणताही निर्णय घेणे हा पायावर धोंडाच पाडून घेणे असल्याने मधला मार्ग शोधण्याची कसरत सुरू आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्यामुळेच शिवसेनेच्या सांगण्यावरून विशेष सर्वसाधारण सभेची तारीख पुढे ढकलली जात आहे. शिवसेनेचे धोरण ठरत नसल्याने पुन्हा एकवार त्यांची कोंडी करण्याची आखणी भाजपने केली आहे.

व्हाॅल्व्ह पूर्ण सोडला नाही या क्षुल्लक कारणावरून सलग दुसऱ्या दिवशीही समांतरचे कार्यालय भाजपने कुलूपबंदच ठेवले समांतरच्या प्रमुखांना मनपात उपमहापौरांच्या दालनात पाचारण करून भाजपच्या नेत्यांनी आरोपांच्या फैरी झाडल्या. हे करतानाच भाजपचे नितीन चित्ते, मनिषा मुंडे, भाजप समर्थित आघाडीचे कैलास गायकवाड, कीर्ती शिंदे या चार स्थायी समिती सदस्यांनी महापौरांना पत्र लिहीत समांतरचा निर्णय घेण्यासाठी तीन दिवसांत विशेष सर्वसाधारण सभा बोलावण्याची मागणी केली आहे. स्थायीच्या किमान चार सदस्यांनी विशेष सभेची मागणी केल्यास तीन दिवसांत बैठक घेणे बंधनकारक असते. धोरण भूमिका ठरलेल्या शिवसेनेची अशी गोची भाजपने केली अााहे.

...तर कार्यालय बंद राहील
मनपाच्या लेखा विभागात माहिती घेतली असता समांतरचे या तिमाहीचे पैसे १५ तारखेपर्यंत देणे अाहे, ते दिले जातील. इतर रक्कम थकलेली नाही असे सांगण्यात आले. तिकडे समांतरनेही भाजपच्या आरोपांना उत्तर दिले असून जी कामे एका रात्रीत होणे शक्य नाही अशा समस्या भाजप वारंवार उचलत आहे. जोपर्यंत भाजपच्या प्रत्येक आरोपाचे पूर्ण उत्तर देणार नाही तोपर्यंत समांतरचे मुख्य कार्यालय बंदच राहील असेही कंपनीने जाहीर केले आहे.

समांतर प्रमुखांची कानउघडणी
आज दुपारी उपमहापौर प्रमोद राठोड यांच्या दालनात भाजपचे शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी, गटनेते भगवान घडामोडे इतर नगरसेवकांनी समांतरचे प्रमुख तारीक खान यांना बोलावून घेतले समांतरचे कर्मचारी अरेरावी करतात, आम्ही नागरिकांसाटी भांडत असताना आमच्यावरच पोलिसांत तक्रारी करण्याच्या धमक्या देतात. वसुली गुंडांमार्फत सुरू आहे, पाणीपुरवठा सुरळीत नाही, तक्रारीचे निवारण वेळेवर होत नाही, देखभाल दुरुस्ती होत नाही अादी बाबींवर चर्चा झाली. या वेळी खान यांनी मनपाकडून पैसे येणे थांबले आहे, आम्ही काम कसे करणार असा प्रश्न विचारल्यावर तनवाणी यांनी त्यांना तसे लिहून द्या असे सांगितले. त्यानुसार खान यांनी पत्र देत सहाव्या सातव्या माइलस्टोनचे, टॅकरच्या बिलाचे तसेच मनपाच्या मालमत्तांना पुरवलेल्या पाण्याचे पैसे थकले असून ते लवकर दिल्यास काम करणे अवघड असल्याचे म्हटले अाहे.
बातम्या आणखी आहेत...