आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मैत्रीपूर्ण लढतीची मागणी अन् शक्यताही भाजपने फेटाळली

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - जिल्हा परिषद निवडणुकीत काही ठिकाणी शिवसेनेशी युती न करता मैत्रीपूर्ण लढती होऊ द्याव्यात, अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या विभागीय बैठकी दरम्यान करण्यात आल्याचे कार्यकर्त्यांनी पत्रकारांना सांगितले. मात्र अशी कोणतीही मागणी आमच्याकडे आली नाही आणि मैत्रीपूर्ण लढती होणार नाहीच, असे भाजपकडून स्पष्ट करण्यात आले.
औरंगाबादसह नांदेड, लातूर आणि जालना या चार जिल्ह्यांतील पदाधिका-यांची विभागीय बैठक उस्मापुरास्थित पक्ष कार्यालयात झाली. त्यानंतर प्रदेश सरचिटणीस, खासदार रावसाहेब दानवे यांनी वरील दोन्हीही शक्यता फेटाळल्या. कोणत्याही परिस्थितीत आम्हाला ही निवडणूक जिंकायची आहे. त्याची रणनीती आखण्याचे काम सुरू आहे. दिवस थोडे आहे पण आम्ही ही लढाई लीलया जिंकू. काही ठिकाणी जागा वाटपावरून मतभेद दिसत असले तरी येत्या काही दिवसांत ते दूर होतील. उमेदवार निवडून येण्याची दाट शक्यता असलेले सर्कल रिपाइंला देण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे दानवे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
17 जानेवारीला मुलाखती - भारतीय जनता पक्षाच्या औरंगाबाद जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या उमेदवारांच्या मुलाखती 17 जानेवारीला होणार असल्याचे जिल्हाध्यक्ष सुरेश बनकर यांनी सांगितले.
४ याआधीच्या निवडणुकीत सेनेने लढविलेल्या सर्कलमध्ये ते लढतील. आम्ही लढलो होतो तेथे आम्ही लढू. दोघे मिळून रिपाइंसाठी काही जागा सोडल्या जातील. कोणत्या जागा सोडाव्यात यावरून सध्या मतभेद आहेत. ते लवकर दूर होतील. मैत्रीपूर्ण लढतींचा विचार आमच्या कार्यकर्त्याच्या मनालाही शिवलेला नाही. - रावसाहेब दानवे, प्रदेश सरचिटणीस