आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईच्या आदेशाने भाजप थंड, अविश्वास ठरावानंतरही आयुक्त सभागृहात आल्याने सेनेचा तिळपापड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मनपा आयुक्त प्रकाश महाजन पोलिस बंदोबस्तातच महापालिकेत दाखल झाले. - Divya Marathi
मनपा आयुक्त प्रकाश महाजन पोलिस बंदोबस्तातच महापालिकेत दाखल झाले.
औरंगाबाद - २० ऑक्टोबर रोजी अविश्वास प्रस्ताव मंजूर होऊनही आयुक्त प्रकाश महाजन गुरुवारी स्थायी समितीच्या बैठकीला पोलिस बंदोबस्त घेऊन आले. त्यामुळे सेनेचे नगरसेवक आक्रमक झाले. तर मुंबईहून आदेश आल्यामुळे भाजपचा महाजनविरोध थंडावल्याचे दिसून आले.

महाजन हटावसाठी गेल्या महिन्यात झालेल्या सभेत भाजपनेही मोर्चेबांधणी केली होती. त्यामुळे त्यांना विरोधाचा पवित्रा कायम राहील, अशीच सर्वांची अपेक्षा होती. प्रत्यक्षात सेना सदस्य चवताळून आयुक्तांच्या उपस्थितीला आक्षेप घेत असताना भाजपने थंड, बचावात्मक धोरण ठेवले. महाजनांबद्दल वेट अँड वॉच असे स्पष्ट आदेश मुंबईतून आल्याने अशी स्थिती झाल्याचे भाजपच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले.

दरम्यान, मोहन मेघावाले, गजानन मनगटे यांनी आयुक्त महत्त्वाच्या वेळी आले नाहीत. आणि आता आमचा अपमान करण्यासाठी का आले, असा सवाल केला. नितीन चित्तेंनी प्रस्ताव मंजुरीनंतर आयुक्तांना सभागृहात बसता येते की हे विधी सल्लागार ओ. सी. शिरसाट यांनी स्पष्ट करावे, अशी मागणी केली. गजानन बारवाल यांनी आयुक्तांवर हल्लाबोल केला. ते पाहून सभापती दिलीप थोरात यांनी बैठक तहकूब केली. मग अधिकारी संघटनेने मध्यस्थी करत विषय फार ताणता संपवावा, अशी गळ घातली. नंतर झालेल्या बैठकीत शिरसाट म्हणाले की, मुंबई मनपा अधिनियम ४२ च्या पोटकलम अन्वये आयुक्तांना उपस्थितीचे अधिकार आहेत. महाजन म्हणाले की, अविश्वास प्रस्तावाबाबत शासनाचा निर्णय मला मान्य आहे. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी माझ्या मनात सदस्यांविषयी काहीही कटुता नाही, असा दावा महाजन यांनी केला.

पुढे वाचा... सेनेच्या ताटाखाली मांजर
बातम्या आणखी आहेत...