आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बजरंग दलाला सशक्त करण्याच्या हालचाली, सेनेला शह देण्यासाठी भाजपने उपसले हत्यार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - आक्रमक मित्रपक्ष शिवसेना तसेच प्रमुख विरोधक एमआयएम या दोघांनाही संघटनात्मक पातळीवर शह देण्यासाठी भारतीय जनता पक्षाने आपले जुने हत्यार बाहेर काढण्याचे ठरवले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निगडित आक्रमक अशी ओळख असलेल्या बजरंग दलाला सशक्त करण्याच्या हालचाली पक्ष पातळीवर सुरू झाल्या आहेत. लवकरच या संघटनेचे पुनर्गठण होणार असून त्यात शिवसेनेप्रमाणेच कोणत्याही क्षणी रस्त्यावर उतरण्याची तयारी ठेवणाऱ्या आक्रमक चेहऱ्यांना संधी दिली जाणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी म्हटले.

गेली दोन दशके शिवसेनेसोबत युती असल्याने भाजपला कधीही आक्रमक होण्याची गरज पडली नाही. मात्र, अलीकडच्या विधानसभा निवडणुकीत या दोन्ही पक्षांची युती होऊ शकली नाही. भाजपला एकहाती सत्तेचे डोहाळे लागले असल्याने भविष्यातील काही निवडणुकांत या मित्रांत युती होण्याचे संकेत कमीच आहेत. त्यामुळेच मवाळ अशी प्रतिमा असलेल्या वेळोवेळी ती मुद्दाम जोपासलेल्या भाजपला आता आक्रमक कार्यकर्त्यांची गरज भासू लागली आहे. मात्र, भाजपमध्ये असे कार्यकर्ते नाहीत, तसे तयार होण्याची शक्यताही नाही. दुसरीकडे असे कार्यकर्ते पक्षात आक्रमक झाले तर पक्षाची प्रतिमा खराब होऊ शकते. त्यामुळेच बजरंग दलाचा उपयोग या कामी घेण्याचे ठरवण्यात आल्याचे समजते.

पुढे वाचा... सेनेसारख्या कट्टरतेची गरज, एमआयएममुळे निर्णय, असा होईल फायदा, पदाधिकाऱ्यांकडून जुन्या कार्यकर्त्यांची चाचपणी
बातम्या आणखी आहेत...