आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चार राज्यांतील निवडणुकांचे निकाल सत्तापरिवर्तनाची नांदी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाळूज - देशातील चार राज्यांत नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने घवघवीत यश मिळवले आहे. हे यश म्हणजेच केंद्र व राज्यातील सत्तापरिवर्तनाच्या दिशेने पडलेले पाऊल आहे. त्यासाठी आपण सर्वांनी आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून संघटन मजबुतीसाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन भाजपचे किशोर धनायत यांनी रांजणगाव शेणपुंजी येथील बैठकीत सोमवारी (9 डिसेंबर) केले.
भाजपच्या वाळूज, रांजणगाव शेणपुंजी व अंबेलोहळ या तीन सर्कलच्या बूथ प्रमुखांच्या बैठकीत ते बोलत होते. पक्षाचे तालुकाध्यक्ष गंगाराम हिवाळे अध्यक्षस्थानी होते. जे. बी. पवार, सुभाष गोरे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. धनायत पुढे म्हणाले की, काँॅग्रेस आघाडीच्या राज्यात महागाई, बेरोजगारीमुळे जनता होरपळून जात आहे. या राज्यकर्त्यांना जनता कंटाळली आहे. त्यामुळे भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांचे हात बळकट क रून देशात सत्तापरिवर्तन घडवायचे आहे. या कामात महत्त्वाचा दुवा असलेल्या बूथ प्रतिनिधींच्या निवडीचे काम प्रत्येक गावात सुरू आहे. आपण सर्वांनी गाफील न राहता ही कामे चोख बजावण्याचे आवाहनही त्यांनी केले. सुरेश राऊत, सुनील प्रधान, बापू गोरे, सुरेश गायके, अप्पासाहेब मखरे, अमोल शिंदे, संदीप प्रधान, दीपक बिडवे, रामनाथ मते, हाफीज पटेल, सुलोचना पवार, भाऊसाहेब सोनवणे, प्रकाश सोळुंके यांच्यासह कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती.