आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपने आयात केलेले उमेदवार ठरले विजयी, पक्षाच्या चाणाक्षपणाने जि. प. वाढले चार पटीने संख्याबळ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - भारतीय जनता पक्षाने ग्रामीण भागात कार्यकर्त्यांची हवी तशी फळी नसतानाही कुठल्याही परिस्थितीत स्थानिक स्वराज्य संस्था काबीज करण्याचे आव्हान स्वीकारले होते. त्यानुसार निवडणूक समिती गठित केली. समितीने चाणाक्ष पद्धतीने इतर पक्षांतील दुखावलेले उमेदवार आयात करून त्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. यापैकी बहुतांश उमेदवार विजयी झाले असून, ते अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी किंगमेकर ठरले आहेत. जिल्हा परिषदेमध्ये भाजपचे संख्याबळ चार पटीने वाढले आहे. 
 
लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचार आणि प्रसाराच्या जोरावर देशात बहुमताने एकहाती सत्ता मिळवली. विधानसभेत थोडक्यात बहुमत हुकले. त्यामुळे शिवसेनेसोबत तोडलेली युती पुन्हा करावी लागली. असे असतानाही राज्यातील मुंबई महापालिका इतर महापालिका, २५ मिनी मंत्रालय, पंचायत समिती निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला. भाजपने निवडणूक रिंगणात काही गुंड प्रवृत्तीच्या उमेदवारांना उतरवल्याची टीकाही झाली. पण याकडे फारसे लक्ष दिले नाही.
 
भाजप आपल्या मिशनवर ठाम राहिला आणि केवळ विजय कसा खेचून आणता येईल हेच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवले. २२ उमेदवार निवडून आणले आणि एक पुरस्कृत असे २३ सदस्य संख्याबळ झाले. सत्ता स्थापनेसाठी सदस्यांचे पाठबळ हवे आहे. त्या दृष्टीने रणनीती आखली जात असून, अध्यक्ष भाजपचाच व्हावा, त्यासाठी निवडणूक समितीचे पदाधिकारी कामाला लागले आहेत. 
 
येथे आत्मपरीक्षणाची गरज : पैठणमध्ये भाजपला एकाही जागेवर विजय मिळवता आलेला नाही. सोयगाव आणि वैजापूर तालुक्यात प्रत्येकी जागेवर विजय मिळाला. येथे पक्षाला आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. उर्वरित सिल्लोड गंगापूर प्रत्येकी ४, औरंगाबाद, कन्नड, फुलंब्री आणि खुलताबादेत प्रत्येकी ३, असे एकूण २२ सदस्य निवडून आले आहेत. 
बातम्या आणखी आहेत...