आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बजाजनगरात शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला प्रथमच खिंडार; 2 जि.प, 2 ग्रामपंचायतींवर भाजपचे ‘कमळ’

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भाजपच्या ज्योती अनिलकुमार चोरडिया रेखा गजानन नांदूरकर विजयी झाल्या. - Divya Marathi
भाजपच्या ज्योती अनिलकुमार चोरडिया रेखा गजानन नांदूरकर विजयी झाल्या.
बजाजनगर- वडगाव कोल्हाटी येथील नागरिकांनी यंदा ‘मनुष्य’ पाहून मतदान केले. अनेक वर्षांपासून परिसरात सत्तेत असणाऱ्या शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात यंदा प्रथमच भाजपच्या दोन जिल्हा परिषद दोन पंचायत समितीच्या उमेदवारांना विजयी करत बजाजनगरात ‘कमळ’ फुलवले. येथील ४९ व ५० या दोन्ही गटामधून शिवसेनेला मागे टाकत भाजपने ‘गड’ काबीज केला. 
 
मतदानाचा कौल? : जिल्हापरिषद - गट नंबर ४९ मधून शिवसेनेच्या पूनम प्रकाश भोसले यांना १५० मतांनी मागे टाकत भाजपच्या रेखा गजानन नांदूरकर या हजार ५९८ मतांनी विजयी झाल्या. गट नंबर ५० मधून शिवसेनेच्या रत्नमाला शशिकांत ढमढेरे यांना ४७६ मतांनी मागे टाकत भाजपच्या ज्योती अनिलकुमार चोरडिया हजार ४८१ मतांनी विजयी झाल्या. 
 
पंचायत समिती - बजाजनगर-वडगाव कोल्हाटीमध्ये दोन जिल्हा परिषद तर चार पंचायत समितीच्या जागांसाठी निवडणूक झाली. त्यामध्ये गण क्रमांक ९७ ९८ गण क्रमांक ९९ १०० चा समावेश आहे. गण क्रमांक ९७ मधील भाजपच्या सूरज सुनील कोल्हे यांना हजार १४६ मतांनी मागे टाकत शिवसेनेचे राजेश तुकाराम साळे हजार ७५३ मते घेऊन विजयी झाले, तर गण क्रमांक ९८ मधील शिवसेनेचे उमेदवार संजय रघुनाथराव शहाणे यांना ३८६ मतांनी मागे टाकत भाजपचे सतीश राजाराम पाटील हजार ७३५ मते घेऊन विजयी झाले. गण क्रमांक ९९ मधील शिवसेनेचे अधिकराव पाटील यांना ७४ मतांनी मागे टाकत लक्ष्मण तुकाराम लांडे हजार २०१ मतांनी विजयी झाले. तसेच गण क्रमांक १०० मध्ये तिरंगी लढत झाली. शिवसेना भाजपच्या मतांचे विभाजन झाल्यामुळे अपक्ष उमेदवार संतोष उत्तम गवळी हजार ४९३ मते घेऊन विजयी झाले.

 
बंडखोरीमुळे चित्र पालटले : शिवसेनेच्याबंडखोर उमेदवार मीराताई राजाराम पाटील यांनी अपक्ष निवडणूक लढवत तब्बल हजार ६०१ मते मिळवत दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या शिवसेनेच्या रत्नमाला ढमढेरे यांना अडचणीत आणले. परिणामी मतांचे विभाजन झाल्यामुळे शिवसेना विरुद्ध शिवसेना बंडखोर उमेदवार अशी लढत झाल्यामुळे भाजपच्या ज्योती चोरडिया सहज निवडून आल्या. 
 
अंतर्गत गटबाजीचा फटका 
शिवसेनेच्याअंतर्गत गटबाजीमुळे तसेच एका गटाच्या उमेदवाराला तिकीट मिळाले की, दुसऱ्या गटाने विरोधात काम करायचे या कारणास्तव एकेकाळी शिवसेनेचा गट संबोधल्या जाणाऱ्या बजाजनगर-वडगावातून शिवसेनेला दारुण पराभवाला सामोरे जावे लागल्याची चर्चा आहे. 
 
बातम्या आणखी आहेत...