आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपचे ७५ बंडखोर, निम्मे सेनेच्या विरोधात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - औरंगाबाद महापालिकेत युती झाली असली तरी भाजपच्या ७५ जणांनी बंडखोरी केली आहे. त्यातील निम्म्यापेक्षा अधिक जण शिवसेेनेच्या विरोधात आहेत. या बंडखोरांना थंड करण्याची जबाबदारी भाजपने मंडळ अध्यक्ष, कोअर समितीच्या सदस्यांवर सोपवली आहे, अशी माहिती आमदार अतुल सावे यांनी दिली.

महिनाभरापूर्वी भाजपच्या नेत्यांनी स्वबळाचा नारा दिल्याने इच्छुकांनी जोरदार तयारी केली. मात्र, ऐनवेळी युतीचा निर्णय झाल्याने त्यांच्या तयारीवर पाणी फेरले गेले. म्हणून त्यांनी बंडखोरीचा नारा दिला आहे. कोटला कॉलनीमधून राधा कचरू घोडके, शिवाजीनगरमधून ललित माळी, एकतानगरमधून शिवसेनेचे सुरेश फसाटे यांच्या विरोधात बाबासाहेब रामभाऊ गवळी, तर वानखेडेनगरमध्ये ज्ञानोबा मुंडे यांचे नातू आदित्य दराडे यांनी अर्ज भरला आहे. सुरेवाडीमध्ये शिवसेनेच्या सीताराम सुरे यांच्याविरोधात भाजपचे माजी नगरसेवक भाऊसाहेब ताठे यांनी बंडखोरी केली आहे.
पुढे वाचा... शिवसेनेला सुटलेल्या रोजेबाग भारतनगरमधून भाजपच्या सतीश छापेकर यांनी बंडखोरी केली आहे.