आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद बसस्थानकात स्फोट, हमालासह पाच जण जखमी; प्रवाशांची धावाधाव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बसस्थानकात स्टेशनरीच्या खोक्याची तपासणी करण्यात आली. - Divya Marathi
बसस्थानकात स्टेशनरीच्या खोक्याची तपासणी करण्यात आली.
औरंगाबाद - मध्यवर्ती बसस्थानक. मंगळवारी सकाळी अकराची वेळ. अनेक वर्षांपासून हमाली काम करणारे शफिकोद्दीन यांनी नेहमीप्रमाणे फलाट क्रमांक नऊवर उभ्या असलेल्या पैठण-पाथर्डी (एमएच-०७-सी-७३४२) बसचा दरवाजा उघडून हातातील स्टेशनरीचे खोके समोरील आसनाकडे जोरात ढकलले आणि त्याच क्षणाला जोरदार स्फोट होऊन धूर निघू लागला.
बसमधील प्रवासी मिळेल त्या खिडकीतून जीव मुठीत धरून खाली उतरण्याचा प्रयत्न करत होते. काही मिनिटांच्या आत पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांच्यासह सर्वच बडे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. बॉम्ब शोधक नाशक पथकाच्या तपासात हा स्टेशनरीच्या नावाखाली पाठवल्या जात असलेल्या खोक्यातील घातक रसायनांचा स्फोट असल्याचे स्पष्ट झाले. निष्काळजीपणामुळे घडलेला हा अपघात असून त्यामागे कोणताही घातपात नसल्याचा निर्वाळा पोलिसांनी दिला. या घटनेत शफिकोद्दीन गंभीर तर चार जण किरकोळ जखमी झाले आहेत. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले.

पाथर्डी (जि. अहमदनगर) येथील आनंद महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेसाठी काल्डा कॉर्नर येथील विशाल एंटरप्रायझेसकडून हे खोके पाठवले जात होते, अशी माहिती पोलिस निरीक्षक नागनाथ कोडे यांनी दिली. हमाल शेख शफिकोद्दीन शेख नईमोद्दीन ऊर्फ बाबा (५०, रा. हिलाल कॉलनी), सचिन पोपटराव गायकवाड (३२, रा. छत्रपतीनगर, सातारा), कालिदास दशरथ चव्हाण (४६, रा. दिनसावंगी, ता. पाथर्डी, जि. अहमदनगर), दीपाली विठ्ठल शेळके (१८, रा. सातारा), छाया संतोष पोतारवाडे (२०, रा.सूर्याेदय हाउसिंग सोसायटी, सातारा), युवराज संतोष कत्तरवाडे (२ ) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. त्यातील शफियोद्दीन यांच्यावर घाटीत उपचार सुरू असून इतरांना प्रथमोपचारानंतर घरी जाण्याची परवानगी देण्यात आली.
पुढे वाचा...
> हमालांनी केले काम बंद
>खोक्यात अॅसिड असल्याचे माहितच नव्हते
>एसटीत कोणीही काहीही नेऊ शकते
>पोलिसांनी बाटल्या केल्या जप्त
>दोषींवर कडक कारवाई : आयुक्त
>तिघांवर गुन्हा
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)