आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Blind Girl Made Diwali Festival Product In Waluj

अंध मुलींची प्रकाशाकडे वाटचाल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाळूज - प्रकाशाचा सण म्हणून ओळखला जाणारी दिवाळी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. हा सण अंध मुलींच्या आयुष्यात प्रकाश घेऊन आला आहे. वाळूज येथील काही अंध मुली सुगंधित उटणे बनवून त्याची विक्री करतात. त्यातून त्यांना आर्थिक आधार मिळतो. वाळूज येथील पाच अंध मुली उटणे बनवण्याचे प्रशिक्षण घेण्यासाठी मुंबईला गेल्या आहेत.

मुंबई येथील राष्ट्रीय दृष्टिहीन संस्थेच्या वतीने अंधांच्या पुनर्वसनासाठी वाळूज परिसरात स्व. रंगलालजी रामरतन बाहेती अंध मुलींचे व्यवसाय प्रशिक्षण व स्वयंरोजगार आणि पुनर्वसन केंद्र 5 जून 2007 रोजी सुरू करण्यात आले. हे पुनर्वसन केंद्रकेवळ मुलींसाठी कार्य करते. यात अंध मुलींना व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाते. विशेष म्हणजे अंध मुलींना प्रशिक्षण देणारे प्रशिक्षकही अंधच आहेत. राज्यभरातील अंध व अंशत: अंध मुलींना दोन वर्षांचे निवासी प्रशिक्षण दिले जाते. येथे प्रशिक्षण घेतलेल्या अनेक मुली आज स्वत:च्या पायावर उभ्या आहेत.

महाराष्ट्रात आठ केंद्रे
अंधांनी अंधांच्या पुनर्वसनासाठी मुंबईतील राष्ट्रीय दृष्टिहीन संस्थेच्या माध्यमातून राज्यभरात पुनर्वसन केंद्रे सुरू केली आहेत. संस्थेतर्फे मुंबई, पुणे, नाशिक, अमरावती, नागपूर, औरंगाबाद, लातूर, सोलापूर या आठ केंद्रांतून अंध व अंशत: अंध महिला व मुलींच्या रोजगार व पुनर्वसनाचा प्रश्न सोडवला जात आहे.

आर्थिक स्वावलंबनाच्या वाटेवर
17 सप्टेंबर रोजी वाळूज केंद्रातील पाच मुली मुंबई येथे सुगंधी उटणे प्रशिक्षण शिबिरासाठी रवाना झाल्या. यात माया गायकवाड, ताई सोनवणे, संगीता गिरी, रंजना खोकले, शोभा मेंडके यांचा समावेश आहे.\\

आत्मविश्वास पाहून समाधान वाटते
7 वर्षांपासून केंद्रात अनेक मुली येताना मी पाहतो. त्या वेळी त्या आत्मविश्वास गमावलेल्या दिसतात. परंतु प्रशिक्षण पूर्ण क रून त्या जातात तेव्हा त्यांच्यामधील आत्मविश्वास पाहून समाधान वाटते. मुली मेहनतीने उटणे तयार करतात. त्यामुळे त्याची खरेदी करण्यासाठी समाजातील जागृत नागरिकांनी पुढे आले पाहिजे. ज्ञानेश्वर वडकर, कर्मचारी

सर्वत्र उटणे प्रशिक्षणाची व्यवस्था करणार
सध्या केवळ मुंबईतच सुगंधित उटणे बनवण्याचे प्रशिक्षण दिले जाते. या उटण्याला चांगली मागणी आहे. यामुळे आम्ही अन्य केंद्रांवर प्रशिक्षणाची सोय करणार आहोत. वसंत हेगडे, महासचिव, दृष्टिहीन संघ,