आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंध व्यक्ती शिकणार अँड्रॉइड मोबाइलवर अॅप्सचे फंक्शन, दोन सत्रांत कार्यशाळा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - अंध व्यक्तींनाही अँड्र(इड मोबाइल हाताळता यावा, मोबाइलद्वारे बँकेचे व्यवहार करता यावे या भावनेने नॅशनल असोसिएशन फॉर दि ब्लाइंड या संस्थेच्या वतीने मराठवाड्यात पहिल्यांदाच अंधांसाठी एका कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. यात अंध तज्ज्ञ विद्यार्थीच अँड्रॉइड मोबाइल अॅप्लिकेशन शिकवणार आहेत.
नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड (नॅब) ही संस्था अंधांसाठी काम करते. औरंगाबाद शहरात याची शाखा शास्त्रीनगर, गारखेडा भागात आहे. ज्येष्ठ नेत्रतज्ज्ञ डॉ.ए.ए. देशपांडे हे या शाखेचे अध्यक्ष तर मधुकर तांदळे हे सचिव आहेत. ही संस्था सतत अंधांसाठी विविध कार्यक्रम घेत असते. यात पांढरी काठी देऊन तिचा वापर रस्त्याने चालताना कसा करावा, ब्रेल लिपी शिकवणे, अंधांना शिक्षणास मदत करणे, व्यवसाय करण्यास मदत करणे, अंध विद्यार्थांना सरकारी योजनांचा लाभ मिळवून देणे ही कामे करते.

पुण्याचे तीन अंध तरुण आले पुढे
सध्या सर्वत्र स्मार्टफोनचा बोलबाला सुरू असताना अंधही या स्पर्धेत मागे पडू नयेत या विचाराने त्यांना स्मार्टफोनचे प्रशिक्षण द्यावे असा विचार संस्थेच्या सदस्यांच्या मनात आला. पण त्यांना प्रशिक्षण देणार कोण असा प्रश्न होता. तेव्हा पुण्यातील तेजस बेंद्रे, अमर दादले, शिवाजी लोंढे हे तिघे अंध पदवीधर आणि अंध विद्यार्थांना शिकवणारे मारुती हे या कार्यशाळेत मार्गदर्शन करतील. ऑगस्ट रोजी सकाळी पासून हा कार्यक्रम मुक्तिसोपान न्यास, समर्थनगर येथे नॅब स्नेहाशिष संस्थेच्या वतीने होत आहे. अॅड. अविनाश बोरुळकर, अॅड. पराग बर्डे प्रा. रूपेश भावसार हे या कार्यशाळेसाठी विशेष प्रयत्न करीत आहेत.

पहिल्या सत्रात अंधांना अँड्रॉइड फोनचा वापर डोळस व्यक्तीसारखा कसा करावा, याचे प्रशिक्षण दिले जाईल. अंध व्यक्ती निरनिराळे अॅप्स कसे वापरू शकतात यासह मोबाइलद्वारे इंटरनेट बँकिंग शिकवले जाईल. यासाठी अंधांना स्वत:चा अँड्रॉईड मोबाइल सोबत आणावा लागणार आहे. दुसऱ्या सत्रात संगणक हाताळणे, नवनवीन सॉफ्टवेअरचा वापर, अंधांसाठी व्यवसाच्या संधी यावर मार्गदर्शन केले जाईल. या वेळी संस्थेच्या वतीने चहा, नाष्टा दुपारचे जेवण मोफत दिले जाणार आहे. ही कार्यशाळा मोफत असून त्यासाठी नाव नोंदणी यमुना, १७९, शास्त्रीनगर, हेडगेवार रुग्णालयाच्या मागे येथील संस्थेच्या कार्यालयात करता येईल.
मराठवाड्यात पहिलाच प्रयोग
आम्ही अंधांसाठी सतत विविध कार्यक्रम घेत असतो, पण स्मार्टफोन वापरण्यावर ही पहिलीच कार्यशाळा आहे. चार अंध विद्यार्थी पुढे आले त्यांनी ही तयारी दर्शवल्याने ही कार्यशाळा शक्य होत आहे. प्रथम शंभर अंध व्यक्तींना यात स्मार्टफोनचे अॅप्लिकेशन शिकवण्यात येणार आहे.
डॉ.ए.ए. देशपांडे, अध्यक्ष नॅब

पहिले ब्रेल वाचनालय
अंधव्यक्तींसाठी शहरात पहिले ब्रेल वाचनालय नॅशनल असोसिएशन फॉर दि ब्लाइंड या संस्थेने पन्नालालनगर भागात सुरू केले आहे. तेथे अंध विद्यार्थी व्यक्तींसाठी मोफत पुस्तके पुरवण्याची सोय आहे.
बातम्या आणखी आहेत...