आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरात १० ठिकाणी उपलब्ध होणार सुरक्षित रक्त, किंमत तीच

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शहरात सर्वत्र नॅट (न्युक्लिक अ‍ॅम्प्लिफिकेशन अ‍ॅसिड टेस्ट) चाचणी झालेले रक्त रुग्णांना कमीत कमी वेळात उपलब्ध व्हावे म्हणून दत्ताजी भाले रक्तपेढीने एम-२ येथे शुक्रवारपासून श्री अद्वैत ब्लड स्टोरेज सेंटर सुरू केले. विशेष म्हणजे यामुळे रक्त पिशवीच्या किमतीत कुठलाही बदल करण्यात आलेला नाही.

नुकत्याच झालेल्या एका संशोधनानुसार एचआयव्ही, कावीळ आणि गुप्तरोगांची लागण ही रक्ताच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात होते हे सिद्ध झाले आहे. एका व्यक्तीच्या रक्तामुळे किमान ते लोकांना विविध आजारांची लागण होऊ शकते. रोगांची लागण होऊ नये म्हणून नॅट चाचणीतून गेलेले रक्त वापरणे सर्वाेत्तम आहे. आगामी काळात शहर आणि जिल्ह्यात मिळून १० च्या वर रक्तसाठा केंद्र सुरू करण्याचा दत्ताजी भाले रक्तपेढीचा मानस आहे. बीड, वाळूज, सिल्लोड, अंबड तसेच शहरातील सिग्मा रुग्णालय येथे सेंटर सुरू करण्याविषयी बोलणीही सुरू आहेत. दिवसेंदिवस शहर विस्तारत आहे. अशावेळी शहराच्या वेगवेगळ्या भागांतून रक्तासाठी भाले रक्तपेढी गाठताना रुग्णांच्या नातेवाइकांची दमछाक होते.

नॅट तंत्रज्ञानाचा वापर करून रक्त तपासणी करणारी भाले ही महाराष्ट्रातील एकमेव रक्तपेढी आहे. रक्ताच्या माध्यमातून आजारांचे संक्रमण होण्यामुळे गंभीर आजारांना सामोरे जावे लागते. हे टाळण्यासाठी नागरिकांनी नॅट तपासणीचे रक्त घ्यावे. मात्र, यासाठी त्यांना लांबचा पल्ला गाठावा लागू नये यासाठी ही सोय करण्यात आली आहे.

सेवा हाच उद्देश : भारतातजेव्हा एड्स रोगाची लागण १९८७ ला सर्वप्रथम झाली तेव्हा नैतिक पातळीवर आपला देश उत्तम असल्याने भारतात एड्सचा धोका नाही, असा विचार पुढे आला. मात्र, आज मागे वळून पाहिले तर एड्सच्या रुग्णांचा मोठा आकडा आपल्या देशात दिसून येतो. विशेष म्हणजे रक्त संक्रमणातून एड्स रुग्ण वाढले असल्याचे संशोधनात सिद्ध झाले आहे.

एका व्यक्तीच्या रक्तातून किमान ते नवे रुग्ण तयार होतात. नॅट तंत्रज्ञानाचा वापर करून तपासलेले रक्त दिल्यास अशी लागण झाली नसती. कारण आजार तत्काळ शोधला जातो आणि त्याचे संक्रमण थांबवता येते. यासाठी आम्ही ही योजना हाती घेतली आहे. सेंटर्सच्या माध्यमातून अधिकाधिक रुग्णांपर्यंत आम्ही उच्चप्रतीचे आणि सुरक्षित रक्त पोहोचवू शकू, असा आम्हाला विश्वास आहे.

काय आहे नॅट
व्यक्तीला असलेला आजार हा त्याच्या रक्तनमुन्यातून कळतो. अनेकदा आजाराचे प्रतिजैविके शरीरात आल्यानंतर साधारणत: ते महिन्यांपर्यंत ते सुप्तावस्थेत असतात. या काळात रक्त दिले असेल तर आजार लक्षात येत नाही, हेच रक्त पुढे कुणा रुग्णाला संक्रमित होते आणि त्यालाही रोगाची लागण होते. यासाठी नॅट हे अतिशय उपयुक्त तंत्रज्ञान आहे. नॅट तंत्रज्ञानामुळे प्रतिजैविकाऐवजी रक्तातील संक्रमित जनुके शोधून काढली जातात. संसर्गाच्या अगदी सुरुवातीच्या काळातही जंतूचे अस्तित्व अचूकपणे यामध्ये शोधता येते. यामुळे रक्त अाणि रक्त घटक अधिक सुरक्षित होतात.

काय असेल या केंद्रांवर
या केंद्रांवर प्रत्येक रक्तगटाचे रक्त उपलब्ध राहील. याशिवाय होलब्लड, प्लेटलेट्स, आरबीसी, एफएफपी असे विविध रक्तघटकही उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. याशिवाय नागरिकांच्या दृष्टीने सर्वाधिक महत्त्वाचे म्हणजे यामुळे एकही जास्तीचा रुपया द्यावा लागणार नाही. भाले रक्तपेढीत ज्या दरात रक्त उपलब्ध होते त्याच दरात शहरातील कुठल्याही सेंटरमध्ये उपलब्ध होईल. - डॉ.महेंद्रसिंग चौहान, संचालक, दत्ताजी भाले रक्तपेढी
बातम्या आणखी आहेत...