आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Blood Donation News In Marathi, Muslim Community, Ghati, Aurangabad

शिबिरांच्या माध्यमातून वर्षभरात 2500 मुस्लिम युवकांनी केले रक्तदान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - स्वेच्छा रक्तदानाविषयी मुस्लिम समाजामध्ये जनजागृती वाढली असून शेकडो युवक विविध शिबिरांच्या माध्यमातून उत्स्फूर्तपणे रक्तदान करत आहेत. मागील वर्षभरात सामाजिक संस्थांनी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराच्या माध्यमातून 2500 युवकांनी रक्तदान करून रुग्णांचा जीव वाचवण्यात मोलाचा वाटा उचलला आहे.


मागील काही वर्षांपासून मुस्लिम समाजामध्ये रक्तदानाविषयी जनजागृती वाढली आहे. रक्तदान शिबिरांचे आयोजन करून शेकडो रक्तपिशव्या घाटी रक्तपेढीस उपलब्ध करून देत आहेत. तसेच ते समाजात रक्तदानासाठी मित्र, नातेवाइकांना प्रेरित करत आहेत.


के. के. ग्रुप, फैजान यंग ग्रुप, सय्यद फराज ग्रुप, आझम खान ग्रुप यांनीही रक्तदान शिबिर आयोजित करून घाटी रक्तपेढीस रक्त उपलब्ध करून दिले. सध्या परीक्षा व उन्हाळ्याच्या सुट्या असल्यामुळे रक्तदान शिबिरांचे प्रमाण कमी झाले आहे. यामुळे काही प्रमाणात रक्ताचा तुटवडा भासत आहे. यासाठी स्वेच्छेने रक्तदान करण्याचे आवाहन घाटी रक्तपेढीच्या वतीने करण्यात आले आहे. मागील दोन वर्षांपासून शहरातील 30 ते 35 टक्के शिबिरे मुस्लिम वस्त्यांमध्ये झाली आहेत. उन्हाळ्यात रक्ताचा नेहमी तुटवडा होतो, अशा वेळी मोठय़ा प्रमाणात रक्तदान करावे. असे आवाहन घाटीच्या रक्तपेढीच्या समुपदेशक सुनीता बनकर यांनी केले आहे.


घाटीस दिलेल्या बाटल्या
जमाअत ए इस्लामी हिंद : 453
अल फरहान मेडिकल फाउंडेशन : 176
औरंगाबाद वेल्फेअर सोसायटी : 224
ऑल इंडिया मजलिस : 122
अल असर फाउंडेशन : 77
ग्लोबल फाउंडेशन : 75
अल्तमश ग्रुप : 67
रशीदभाई रिक्षा युनियन : 54
जयहिंद ग्रुप : 52