आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बोर्डेच्या स्थानबद्धतेत जैस्वालांचे कारस्थान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद-भीमशक्तीचा जिल्हाध्यक्ष अरुण बोर्डेविरोधात सूडबुद्धीने कारवाई केली असून त्याच्या स्थानबद्धतेत आमदार प्रदीप जैस्वाल यांचे कटकारस्थान असल्याचा आरोप दलित अत्याचारविरोधी संघर्ष कृती समितीच्या बैठकीत करण्यात आला. शनिवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रात पोलिसांच्या निषेधार्थ बैठक झाली. पोलिस आयुक्त संजयकुमार यांच्याविरोधात घोषणाबाजी, तर जैस्वालांच्या विरोधात रोष व्यक्त करण्यात आला. जैस्वाल यांनी मात्र आरोपात तथ्य नसल्याचे स्पष्ट केले आहे.
माजी नगरसेवक गौतम खरात यांच्या अध्यक्षतेत झालेल्या बैठकीला नगरसेवक मिलिंद दाभाडे, कृष्णा बनकर, प्रकाश जावळे, जालिंदर शेंडगे, दिनकर ओंकार, दौलत खरात, किशोर थोरात, प्रा. सुनील मगरे, संजय ठोकळ, संतोष भिंगारे उपस्थित होते. या वेळी अविनाश अंभोरे, माणिक साळवे, चेतन कांबळे, श्याम भारसाखळे, विनोद बनकर, सय्यद तौफिक, अशोक भातपुडे, राजू साबळे, आनंद गायकवाड यांची उपस्थिती होती. यासंदर्भात पाच तारखेला आमदार चंद्रकांत हंडोरे यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्र्यांची भेट घेतली जाणार असल्याचे गौतम खरात यांनी जाहीर केले.
आरोपात तथ्य नाही
बोर्डेचे आणि माझे चांगले संबंध आहेत. मागील निवडणुकीत मला सर्वाधिक मते बौद्ध समाजानेच दिली. अरुणने तीन दिवसांपूर्वीच मला चहा पाजला. त्यामुळे अशा आरोपात काहीच तथ्य नाही. खालच्या पातळीवर जाऊन मी कधीही राजकारण केले नाही प्रदीप जैस्वाल, आमदार.