आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Boarding School Reject Girl Admission Aurangabad

आश्रमशाळेने नाकारला विद्यार्थिनीला प्रवेश

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - मुलींना शिक्षण देण्यासाठी शासनाचे प्रयत्न सुरू असताना जटवाडा येथील आश्रमशाळेत मात्र नेहा पहाडे या शिक्षणासाठी उत्सुक असलेल्या विद्यार्थिनीला 3 दिवसांपासून प्रवेशासाठी चकरा माराव्या लागत आहेत.

मोफत आणि शिक्षणाचा अधिकार अधिनियम शासनाने मंजूर केला आहे. मात्र, नेहा पहाडे या विद्यार्थिनीला पैसे भरले तरच प्रवेश मिळेल, असे सांगण्यात येत असल्याचा आरोप नेहाच्या वडिलांनी केला आहे. आपल्याकडे पैसे नाहीत. मुलीला शिक्षणाची इच्छा असून तिला प्रवेश देण्यात यावा, अशी मागणी नेहाच्या वडिलांनी निवेदनाद्वारे केली आहे. प्रवेशासाठी दहा हजार रूपयांची मागणी होत असल्याचे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.

पैसे मागितले
सुरुवातीला प्रवेश देतो म्हणून शाळेने विविध प्रकारची कागदपत्रे आणण्यास सांगितले. आता कागदपत्रे आणली आहेत, तर शाळा प्रवेशासाठी पैसे मागत आहे. विजयकुमार पहाडे, पालक

पैसे मागितले नाहीत
आम्ही विद्यार्थिनीला पैसे मागितले नाहीत. आमच्या शाळेची प्रवेश क्षमता जेवढी होती त्यापेक्षा जास्त विद्यार्थी आले. त्यामुळे प्रवेश प्रक्रिया थांबवली आहे. गणेश सोनवणे, आश्रमशाळा मुख्याध्यापक

प्रवेशास हरकत नाही
आश्रमशाळा या समाजकल्याण विभागाच्या अंतर्गत येतात. नियमाप्रमाणे प्रवेशासाठी पैसे मागता येत नाहीत. विद्यार्थिनीचे नुकसान होऊ नये यासाठी प्रवेश देण्यास काहीच हरकत नाही. सुखदेव डेरे, शिक्षण उपसंचालक