आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

EXCLUSIVE: बुद्धगया स्फोटातील संशयिताचे औरंगाबादेत होते वास्तव्य

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- बिहारमधील बुद्धगयेत महाबोधी विहार परिसरात गेल्या 7 जुलै रोजी झालेल्या बॉम्बस्फोटांचे धागेदोरे औरंगाबादपर्यंत पोहोचले आहेत. राष्‍ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) सूचनेनुसार एटीएसच्या पथकाने पंधरा दिवसांपूर्वी औरंगाबादेत आरटीओ कार्यालयाची झाडाझडती घेतली असून येथे वाहन प्रशिक्षण घेऊन परवाना मिळवणा-या एका युवकाच्या मागावर हे पथक आले होते.

औरंगाबादहून मिळवला परवाना: बुद्धगयेतील स्फोटांचा तपास एनआयएकडे सोपवण्यात आला तेव्हा पंचनामा करताना या परिसरात औरंगाबाद येथील आरटीओ कार्यालयाने दिलेला वाहन चालवण्याचा परवाना सापडला होता. हाच धागा पकडून एनआयएने औरंगाबाद एटीएसला तपास करण्यास सांगितले. परवाना कोणत्या वर्षी काढला, चालक कोणत्या एजन्सीत शिकला, त्याचे औरंगाबादेत वास्तव्य कोठे होते यासह संशयित भाड्याने राहत असलेल्या
परिसरातही चौकशी करण्यात आली.