आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTO: ज्यूनिअर चार्लीने केला देहदानाचा संकल्प, आता इतरांनाही करतोय प्रवृत्त

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - आजची पिढी शिक्षण, करिअर हवे तसे जगण्याच्या स्वप्नात रमणारी असल्याचा समज शहरातल्याच काही तरुणांनी मोडीत काढला. त्यांनी स्वत: देहदानाचा संकल्प तर केलाच, शिवाय इतरांनाही देहदान करण्यासाठी प्रोत्साहित करण्यास मोहीम हाती घेतली आहे. आद्विक यूथ फाउंडेशनच्या सर्व सदस्यांनी हा स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे.

स्वत:चे दु:ख विसरून आयुष्यभर दुसऱ्यांना हसवणारा थोर अभिनेता चार्ली चॅपलिन यांच्या १२६ व्या जयंतीनिमित्त आद्विक यूथ फाउंडेशनच्या वतीने ही मोहीम हाती घेण्यात आली. या मोहिमेची सुरुवात ज्युनियर चार्ली सोमनाथ स्वभावणे यांनी १७ तास औरंगाबाद ते शिर्डी सायकल चालवून केली होती. यादरम्यान त्यांनी मार्गावरच्या सर्व गावांमध्ये देहदानाविषयी जनजागृती करत देहदानाचे आवाहन केले होते. बुधवारी घाटी परिसरात राबवलेल्या मोहिमेदरम्यान सुमारे २०० जणांनी सकारात्मक प्रतिसाद देत देहदानाची तयारी दाखवली.
"ज्युनियर'चाही देहदानाचा संकल्प
समाजसेवाकरण्याच्या इच्छेनेच तरुणांनी या फाउंडेशनची स्थापना केली आहे. ज्युनियर चार्ली स्वभावणे यांनी चार्ली चॅपलिनच्या वेशात जनजागृती करून स्वत:ही देहदान केले. ज्युनियर चार्ली यांनी रामनगर, एपीआय कॉर्नर, चिश्तिया कॉलनी, टी. व्ही. सेंटर, जिल्हाधिकारी कार्यालय देहदानाचे आवाहन केले. नागरिकांना यासाठी प्रोत्साहित केले. चार्ली यांच्या १२६ वी जयंतीनिमित्त स्वेच्छेने देहदानासाठी १२६ फॉर्म भरण्याचे त्यांचे लक्ष्य होते.

तरुणाईचा पुढाकार प्रेरणादायी
तरुणवयात फाउंडेशनच्या तरुणांनी देहदानासाठी घेतलेला पुढाकार प्रेरणादायी आहे. इतर तरुणांनीही पुढे येऊन देहदान करावे. डॉ.प्रतिमा कुलकर्णी, शरीररचनाशास्त्र विभागप्रमुख, घाटी
देहदान कशासाठी?
वैद्यकीयअभ्यासक्रमाचे विद्यार्थी, जनसामान्य तसेच गरजू व्यक्तींना डोळे, हात, पाय, तसेच अपंग अंध व्यक्तींना अवयव कामी येत असल्याने देहदान महत्त्वाचे ठरते. निधनानंतरही शरीर कोणासाठी उपयोगी येत आहे, ही भावना सुखावणारी असल्याचे मत सदस्यांनी व्यक्त केले. या सदस्यांना डॉ. प्रतिमा कुलकर्णी यांनी सहकार्य केले. या वेळी सुमीत लहाने, पवन सोनवणे, राहुल पगारे, महेश जांभोरकर, शैलेंद्र बनसोडे, सुनील शिंदे उपस्थित होते.
पुढील स्लाईडवर पाहा, ज्यूनिअर चार्लीचे इतर काही फोटो...