आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घाटनांद्रा घाटात आढळला बेपत्ता 15 वर्षीय मुलीचा मृतदेह, 24 तासांपासून होती बेपत्ता

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ती 10 वीत होती... - Divya Marathi
ती 10 वीत होती...
सोयगाव (गोदेंगाव) -बेपत्ता हनुमंतखेडा (ता. सोयगाव) येथील सोळावर्षीय शालेय विद्यार्थिनीचे शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता अपहरण करून दगडाने ठेचून खून करून तिचा  मृतदेह घाटनांद्रा घाटात फेकून दिला होता. त्याचा शोध शनिवारी लागला.   

स्व. स्वातंत्र्यसैनिक सरिचंद राठोड विद्यालयात १० वी वर्गात  सीमा रामा राठोड (१५) शिक्षण घेत होती. आई मजुरी करण्यासाठी व वडील शेळ्या चारण्यासाठी जंगलात गेले होते. त्यामुळे शुक्रवारी शाळा सुटल्यानंतर आईला मदत म्हणून आपण स्वयंपाक करून ठेवू. दिवसभर काम करून थकलेल्या आईस तितकीच मदत होईल म्हणून भाकरी  टाकण्यासाठी पिठाचा डबा काढला, माठात पाणी घेण्यासाठी गेली, पण माठ कोरडा होता, त्यामुळे  पीठ झाकून सीमा पाणी आणण्यासाठी गावाजवळील विहिरीवर गेली. गावात पाइपलाइनचे काम सुरू असल्याने तीन-चार दिवसांपासून नळाला पाणी आलेले नव्हते. सीमा पाणी घेऊन परत आली नाही  म्हणून आई -वडिलांनी व गावातील मंडळींनी सीमाचा शोध घेतला. नातेवाइकांना फोन करून विचारले, पण रात्री उशिरापर्यंत तपास लागला नाही. म्हणून सकाळी पुन्हा शोध घेण्यास सुरुवात केली व बनोटी दूरक्षेत्रात तक्रार दाखल करण्यासाठी गेले, तेव्हा पोलिस शिपाई योगेश झाल्टे यांना दूरध्वनी आला की घाटनांद्रा घाटात एका मुलीचा मृतदेह पडलेला आहे, अशी माहिती मिळाली. ग्रामस्थ व नातेवाइकांनी मृतदेह सीमाचाच आहे, असे सांगितले.