आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावाळूज - जिकठाण प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत असलेल्या वाळूज भागातील विविध गावांमध्ये मोठय़ा प्रमाणावर बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट वाढला असून ते रुग्णांच्या आरोग्याशी खेळत आहेत, अशा बोगस डॉक्टरांविरुद्ध तत्काळ पोलिस कारवाईचे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाने दिलेले असताना हे आदेश धाब्यावर बसवून वैद्यकीय अधिकार्यांकडून त्यांना पाठीशी घालण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे बोगस डॉक्टरांवरील कारवाईत कुचराई करणार्या वैद्यकीय अधिकार्यांविरुद्धही कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.
वाळूज एमआयडीसी परिसरातील क ासोडा, जोगेश्वरी, रांजणगाव शेणपुंजी, घाणेगाव, बजाजनगर कामगार वसाहत, वाळूज, साजापूर, पंढरपूर, लिंबेजळगाव, तुर्काबाद खराडी, अंबेलोहळ, शेंदुरवादा या भागांतील लोकसंख्या एका दशकात दुपटीने वाढली आहे. त्यामुळे साहजिकच आरोग्याच्या बाबतीत डॉक्टरांची गरज भासते. ग्रामस्थ व रुग्णांची गरज लक्षात घेऊन या गावांमध्ये बोगस डॉक्टरांनी आपले बस्तान बसवले. कोणताही वैद्यकीय परवाना नसताना हे तथाकथित डॉक्टर रुग्णांच्या जीवनाशी खेळत आहेत. सर्रास विविध प्रकारची इंजेक्शन्स व सलाइन दिली जात आहेत.
कंपाउंडर झाले डॉक्टर
परिसरातील अनेक दवाखान्यांमध्ये डॉक्टरांनी त्यांच्या हाताखाली औषधी, गोळ्या व इतर वैद्यकीय साहित्य काढून देण्यासाठी कंपाउंडर ठेवलेले असतात. त्यांना रुग्णांना औषधी, गोळ्या देण्याचे डॉक्टरांकडून सांगितले जाते. त्यातून अनेक कंपाउंडरना निवडक औषधांची क ाही अंशी ओळख होऊन जाते. त्यातून हे कंपाउंडर संबंधित डॅाक्टरांच्या परवान्यावर इतर ठिकाणी दवाखाना टाकतात. ज्या डॉक्टरच्या परवान्याशी तो संलग्न असेल त्या डॉक्टरला त्याच्याकडून महिन्याकाठी माया ठरवून पुरविली जाते. त्यामुळे अशा बोगस डॉक्टरांवर काही कु भांड आले, तरी त्याचा परवानाधारक डॉक्टरांकडून निवाडा केला जातो. वाळूज भागात अनेक ठिकाणी असे बोगस डॉक्टर आढळतात.
स्थानिक पुढार्यांशी संगनमत
कु ठलीही नोंदणी अथवा परवाना नसताना त्यांच्याकडून रुग्णांवर उपचार केले जात आहेत. थंडी-तापाचा रुग्ण असल्यास त्याला आरामही पडतो. मात्र, गंभीर आजाराचा रुग्ण असल्यास हे डॉक्टर त्याला इतर रुग्णालयांत पाठवून देतात. हा व्यवसाय करताना अंगलट येण्यासारखे काही प्रकरण घडल्यास ते बाहेरच्या बाहेर मिटवले जावे, यासाठी बोगस डॉक्टरांकडून सर्रास स्थानिक पुढारी व तथाकथित सामाजिक कार्यकर्ते यांना हाताशी धरले जाते. मागील वर्षानुवष्रे हा प्रकार सुरू आहे. मात्र, कार्यवाही होत नसल्याने बोगस डॉक्टरांचे दवाखाने बिनबोभाटपणे सुरू आहेत.
रुग्णांच्या जीवनाशी होणारा खेळ थांबवा
बोगस डॉक्टरांनी वाळूज भागात उच्छाद मांडला आहे. त्यातून रुग्णांच्या जीवनाशी होणारा खेळ हा मोठा गंभीर प्रकार आहे. या बोगस डॉक्टरांना औषधी, गोळ्या देताना अतिरिक्त डोस दिले जातात. त्यामुळे रुग्णांना व्याधींना सामोरे जावे लागते. त्यातून पैशाचा चुराडा तर होतो आहे. अशा डॉक्टरांविरुद्ध तातडीने कारवाई झाली पाहिजे. ईश्वर मोतकर, रहिवासी, लायननगर, वाळूज.
कारवाईसंदर्भात कल्पना नाही
बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाने दिलेले आदेश नेमके काय आहेत, त्याविषयी मला क ाही सांगता येणार नाही. माहिती घेऊन सांगते. जी. एल. गडकर, वैद्यकीय अधिकारी, जिकठाण प्राथमिक आरोग्य केंद्र
लवकरच गुन्हे नोंदविणार
जिल्हाधिकारी कार्यालयाकडून बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्याचे आदेश मिळाले आहेत. कारवाई केली जाणार आहे. जिकठाण प्राथमिक आरोग्य केंद्राच्या हद्दीत बोगस डॉक्टर असल्याची माहिती मिळाली आहे. जि.प.मध्ये बैठकीनंतर कारवाई करणार आहोत. डॉ. रवींद्र दारुंटे, गंगापूर तालुका वैद्यकीय अधिकारी
वैद्यकीय अधिकारी वर्गाचे पाठबळ
जिल्हाधिकारी कार्यालयाने बोगस डॉक्टरांविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश दिलेले असताना शासकीय वैद्यकीय अधिकारी मात्र कारवाई करण्यास पुढे येत नाहीत. परिणामी बोगस डॉक्टरांचे चांगलेच फ ावत आहे. त्यामुळे कामात कुचराई करणार्यांविरुद्ध कडक कारवाई क रून बोगस डॉक्टरांना आळा घालण्याची मागणी ग्रामस्थ करत आहेत.
कार्यालयाचे आदेश धाब्यावर
जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांनी जिल्ह्यातील सर्व शासकीय तालुका वैद्यकीय अधिकार्यांची 6 सप्टेंबर रोजी बैठक घेतली. या बैठकीत वैद्यकीय परवान्याविना बोगस डॉक्टरांकडून रुग्णांच्या जीवनाशी खेळ खेळला जात असल्यास अशा बोगस डॉक्टरांवर 24 तासांच्या आत पोलिस कारवाई करण्याचे आदेश दिले होते. मात्र, या आदेशाला पंधरा दिवस उलटले तरी वैद्यकीय अधिकारी वर्गाकडून अंमलबजावणी झालेली नाही.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.