आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बोगस पीएचडी : संशोधकांवर कारवाईसाठी आणखी 3 महिने वाट पहा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला बोगस पीएचडीधारकांचा अहवाल सादर केला खरा, पण प्रत्यक्षात कारवाईला आणखी काही महिने थांबावे लागणार आहे. पुन्हा महाविद्यालयांच्या प्राचार्यांना पत्र पाठवून माहिती प्राप्त झाल्यानंतरच कारवाईचा विचार केला जाणार असल्याचे बीसीयूडी संचालक डॉ. एस. पी. झांबरे यांनी सांगितले आहे.

सीएमजे (चंद्रमोहन झा) विद्यापीठाच्या बोगस पीएचडीमुळे राज्यभरात काहूर उठले होते. त्यानुसार उच्चतंत्रशिक्षण विभागाने सर्व विद्यापीठांना बोगस पीएचडीधारकांची चौकशी करण्याचे निर्देश दिले होते. कुलगुरू डॉ. विजय पांढरीपांडे यांनी त्वरित संलग्नित महाविद्यालयांच्या प्राचार्यांकडून माहिती मागवण्यासाठी दोन वेगवेगळे पत्र पाठवले होते. बोगस पीएचडीच्या आधारे नियुक्ती मिळवणार्‍यांची प्राचार्यांनीच नियुक्ती रद्द करावी. या आशयाचे पत्र बीसीयूडी संचालकांच्या सहीने पाठवले होते.

दरम्यान, डिसेंबर महिन्यात डॉ. दिलीप खैरनार यांच्या नेतृत्वात गठित समितीचा अहवाल 29 जुलैला सादर करण्यात आला आहे. त्यानुसार राज्यातील 133 प्राध्यापकांपैकी 125 जणांनी एमफिल तर 8 जणांनी बोगस पीएचडी घेतल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्याशिवाय देशातील 26 विद्यापीठांना पीएचडी पदवी देण्याचा अधिकारच नसल्याचे स्पष्ट केले आहे. समितीने सुस्पष्ट अहवाल दिल्यानंतरही कारवाई होण्यास आणखी वेळ लागणार असल्याचे डॉ. झांबरे यांनी म्हटले आहे. पुन्हा सर्व महाविद्यालयांच्या प्राचार्यांना पत्र पाठवून माहिती गोळा करून दिरंगाईचे सूत्र विद्यापीठ अवलंबत आहे.

इथे छळ, म्हणून तिकडे
येथील विद्यापीठात कशा पद्धतीने आर्थिक, मानसिक शोषण करतात हे सर्वांना माहीत आहे. त्याचे किस्से वर्तमानपत्रात प्रसिद्धही झाले आहेत. पैसे येथील विद्यापीठात द्यावे लागतात. त्याशिवाय गाइडच्या घरच्या कामांना प्राधान्य द्यावे लागते. त्यामुळे येथील विद्यापीठाने कृपया गुणवत्तेच्या गप्पा मारणे बंद करावे. डॉ. आर. व्ही. सिद्दिकी, जेजेटीयूचे पीएचडीधारक

संगणकीकृत तपासणी होते
जेजेटीयू विद्यापीठात शोधप्रबंधाची संगणकावरून तपासणी केली जाते. ‘कॉपी पेस्ट’ मोजणारे खास ‘प्लिग्मीरिज्म’ नावाचे सॉफ्टवेअर आहे. 15 टक्क्यांपेक्षा अधिक कॉपी पेस्ट आढळल्यास प्रबंध आपोआप नाकारला जातो. येथे मात्र त्या पद्धतीची सोय नाही. प्रदीप खांड्रे, संशोधक विद्यार्थी, जेजेटीयू