आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bollywood Actress Rakhi Sawant Coming From Rpi Meeating, Divya Marathi

रिपाइंच्या मेळाव्याला राखी सावंत येणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा (ए) मराठवाडा विभागीय कार्यकर्ता मेळावा 26 जुलै रोजी शहरात होणार आहे. याचे उद्घाटन खासदार रामदास आठवले यांच्या हस्ते होईल. पक्षाच्या राष्‍ट्रीय महिला कार्याध्यक्षा अभिनेत्री राखी सावंत, प्रदेशाध्यक्ष भूपेश थुलकर यांची प्रमुख उपस्थिती राहील, अशी माहिती कार्याध्यक्ष बाबूराव कदम यांनी शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
सिडको नाट्यगृहात होणा-या या मेळाव्यात विधानसभा मतदारसंघाची चाचपणी तसेच मराठवाड्यातील विधानसभा मतदारसंघनिहाय चर्चा करण्यात येणार आहे. पक्षाला राज्यात 25, तर मराठवाड्यात आठ जागा हव्या आहेत. औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघासह फुलंब्री, बदनापूर, गंगाखेड, देगलूर, केज, उमरगा, उदगीर मतदारसंघ हवे आहेत.