आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उत्तम सेक्रेटरीविना हिंदीतील करिअर बोंबलले; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीची खंत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कुठल्याही क्षेत्रात पाय रोवताना उत्तम मार्गदर्शक मिळणे आवश्यक असते. त्यावरच करिअरची पुढील दिशा ठरते. विशेषत: बॉलिवूडमध्ये करिअर करताना सेक्रेटरीची भूमिका महत्त्वाची असते. मला तसा चांगला सेक्रेटरी न मिळाल्याने माझे हिंदीतील करिअर बोंबलले, अशी खंत प्रख्यात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी व्यक्त केली.

‘व्हाइट लिली नाइट रायडर’ या नाटकाच्या निमित्ताने त्या शनिवारी शहरात आल्या होत्या. विविध भाषांमध्ये केलेला अभिनय, रंगभूमी आणि मराठी प्रेक्षक या विषयांवर सोनालीने आमच्याशी केलेली खास बातचित...