आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बॉलीवूड फ्युजन आणि लोकनृत्याचे दणकेबाज सादरीकरण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - ग्रुव्ह डान्स इन्स्टिट्यूटचा वार्षिक सोहळा संत तुकाराम नाट्यगृहात थाटात पार पडला. यामध्ये मुलांनी बॉलीवूड फ्युजन आणि फोक डान्सचे दणकेबाज सादरीकरण केले. विद्यार्थ्यांसोबतच क्लासचे प्रशिक्षक पराग टाकळकर यांनी केलेले नृत्याविष्कार अवाक् करणारे होते.

2008 मध्ये सुरू झालेल्या या इन्स्टिट्यूटमध्ये वेस्टर्न, हिपहॉप, कंटेम्प्ररी, बॉलीवूड आणि लोकनृत्य अशा विविध नृत्यांचे प्रशिक्षण दिले जाते. गेल्या 6 वर्षांत बिगर शास्त्रीय नृत्य प्रकारांमध्ये झालेल्या बदलांचा आढावा घेत शहरात नृत्यकलावंत निर्मितीत इन्स्टिट्यूटने मोठे योगदान दिले आहे. ‘बावरे बावरे’ या लक बाय चान्स चित्रपटातील गाण्याने कार्यक्रमाची सुरुवात झाली. खो-खो चित्रपटातील ‘उदो उदो’ गाण्यावर नृत्य करत कलावंतांनी लोकनृत्याची पर्वणी दिली.

‘जब तक है जान’ चित्रपटातील ‘तेरे जुल्फों की लहेराती अंगडाईयां’ आणि ‘आओ हुजूर तुमको सितारों में ले चलू, झुमका गिरा रे, ‘मुझको हुई ना खबर’अशा जबरदस्त लय असलेल्या ठसकेबाज गाण्यांचे फ्युजन सर्वांना जिंकून गेले. पराग टाकळकर यांनी ‘इलाही मेरा’ या ‘ये जवानी है दिवानी’ चित्रपटातील गाण्यावर केलेले नृत्य विलक्षण ठरले. भरभरून दाद आणि वन्स मोअर मिळवणार्‍या या गाण्याने सर्वांची मने जिंकली. रचित सहस्रबुद्धे यांनी ‘पांडेजी सिटी, गंदी बात’ ही नृत्ये सादर करत उपस्थितांना जिकले. कार्यक्रमाच्या शेवटी मुलांनी आपापले मनोगत व्यक्त केले. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र विभागाचे प्रा. जयंत शेवतेकर, कार्यक्रमाच्या प्रायोजक ज्योती जाधव यांची उपस्थिती होती. शिवानी शेटे आणि क्लासच्या विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी परिश्रम घेतले.
फोटो - संत तुकाराम नाट्यगृहात ग्रुव्ह डान्सच्या विद्यार्थ्यांनी नृत्य सादरीकरणानंतर असा पोज दिला.