आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बॉम्बशोधक आणि नाशक पथकाकडे एकच ‘सूट’

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - शहरात अतिरेक्यांनी साखळी बॉम्बस्फोट घडवण्याचा कट रचल्यास शहरातील पोलिस यंत्रणा कुचकामी ठरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याचे कारण म्हणजे शहरातील बॉम्बशोधक आणि नाशक पथकात केवळ पाचच कर्मचारी असून त्यांच्याकडे केवळ एकच बॉम्बसूट असल्याची माहिती पुढे आली आहे. एका बॉम्बसूटच्या भरवशावर हे पथक अनेक ठिकाणी पेरलेले बॉम्ब निकामी कसे करू शकेल, अशी शंका आहे.

पुणे बॉम्बस्फोटाच्या धर्तीवर ‘दिव्य मराठी’ने शहराच्या सुरक्षिततेबाबत पोलिस अधिकार्‍यांसह बॉम्ब शोधक व नाशक पथकाशी संवाद साधला असता बॉम्बशोधक आणि नाशक पथकाकडे केवळ एकच बॉम्बसूट असल्याचे निदर्शनास आले. 1994 मध्ये औरंगाबादमध्ये बॉम्ब स्क्वॉडची स्थापना झाली. संपूर्ण मराठवाड्याचा भार याच पथकावर आहे. राज्य शासनाने आता जिल्हास्तरांवर बॉम्ब स्क्वॉड स्थापन केले. मात्र, इतर जिल्ह्यांच्या ठिकाणी असलेल्या पथकातील काही कर्मचारी प्रशिक्षित नाहीत. यामुळे संशयित वस्तू आढळून आल्यास औरंगाबादच्याच बॉम्ब स्क्वॉडला पाचारण केले जात आहे. त्यात एकाच वेळी ठिकठिकाणी बॉम्ब असल्याची माहिती मिळाल्यास केवळ एकाच ठिकाणी हे पथक एका बॉम्ब सूटसह दाखल होऊ शकते. अशीच भयावह अवस्था औरंगाबाद शहराचीही आहे. या पथकातील एक अधिकारी आणि चार कर्मचार्‍यांनी बॉम्ब नष्ट करण्याचे प्रशिक्षण घेतलेले आहे. यापूर्वी या पथकात बॉम्ब नाशकाचे प्रशिक्षण घेतलेले 6 कर्मचारी होते. त्यापैकी दोघांची पोलिस ठाण्यांना बदली झाली आहे. त्यांच्या जागी प्रशिक्षण घेतलेल्या दोन कर्मचार्‍यांची सध्या बॉम्ब स्क्वॉडला आवश्यकता आहे.

या पथकात 16 तंत्रज्ञ असून, 15 श्वान हस्तक आहेत, तर बॉम्बचा शोध घेण्यासाठी सात श्वान आहेत. हरियाणातील मनेसर येथे दीड महिन्याचे एनएसजी प्रशिक्षण दिले जाते. बॉम्ब बनवण्यापासून त्याचा नाश कसा करावा इथपर्यंत या कर्मचार्‍यांना प्रशिक्षण दिले जाते.