आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दीड लाख दैनंदिन खर्चाची तारेवरची ‘सर्कस’

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - सर्कस म्हणजे शहरात राहणारे छोटे गावच. औरंगाबादेत आलेली दि ग्रेट बॉम्बे सर्कस तर वसुधैव कुटुंबकम््चा प्रत्यय देते. ४ देश, १२ राज्ये आणि १२ परदेशींसह २५० सदस्य या सर्कसमध्ये कुटुंबाप्रमाणे राहतात. त्यांच्यासोबत ५० पक्षी आणि प्राणी आनंदाने नांदतात. भलामोठा तंबू, स्ट्रक्चर आणि पक्षी-प्राण्यांच्या या ताफ्याची किंमत १० कोटींच्या घरात आहे, तर या कुटुंबासाठी दिवसाकाठी दीड ते पावणेदोन लाख रुपयांहून अधिक खर्च होतो. त्या तुलनेत साडेतीन लाख रुपये उत्पन्नही मिळतेय.

उत्पन्नाच्या तुलनेत खर्च मात्र अधिक असल्याने सर्कस चालवताना तारेवरची कसरत करावी लागत असल्याचे सर्कस मालक सांगतात. भारतात इंडियन सर्कस फेडरेशन ही सर्कस मालकांची संघटना आहे. याचे मुख्यालय दिल्लीत असून ए ग्रेडमधील दि ग्रेट बॉम्बे सर्कस, ग्रेट रॉयल सर्कस, ग्रेट रेमन सर्कस, अमर सर्कस, जेमिनी सर्कस, राजकमल सर्कस, जम्बो सर्कस, रेम्बो सर्कस, मूनलाइट सर्कस आदी १२ सर्कस याचे सदस्य आहेत. फेडरेशनशिवाय किमान २०० ते २२५ सर्कस देशभरात कार्यरत आहेत. फेडरेशन फार सक्रिय नसल्याचे एका सर्कस मालकाने सांगितले.

फार फायदा होत नाही
सर्कस चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे. हा दिसणारा खर्च आहे. याशिवाय प्रवासावर मोठा खर्च होताे. कलाकार, प्राण्यांच्या आजारपणाला पैसा लागतो. औरंगाबादेत तर दोन सर्कस आल्यामुळे नफा अर्ध्यावर आला आहे. पावसामुळे खेळ नाही झाले तरी कलाकारांना पैसा द्यावाच लागतो. यामुळे हा काही फायद्याचा सौदा नाही. तरी अाम्ही वेड म्हणून सर्कस चालवतोय. - संजीव बालगोपाल, संचालक, ग्रेट बॉम्बे सर्कस

असा आहे दैनंदिन खर्च
व्यवस्थापन, वाहतूक, मेस, प्रचार, इलेक्ट्रिक, वेल्डिंग, लायसनिंग, ऑर्केस्ट्रा विभाग आहेत. व्यवस्थापनात मालकासह ४ मॅनेजर असून त्यांचे वेतन ५० ते ६० हजार आहे. वाहतूक विभागात ४० ट्रक आहेत. जळगावहून औरंगाबादेत येण्यासाठी त्यांना चार लाख खर्च आला. तर ४ इनोव्हा आहेत. प्रचारासाठी २ व्हॅन असून ५०० रिक्षांवर बॅनर लावतात. त्या बदल्यात प्रत्येकी चार याप्रमाणे आठवड्याला २००० पास दिले जातात. येथे चार मेस असून दिवसाकाठी २५ ते ३० हजार खर्च होतो, तर प्राणी, पक्ष्यांच्या खाण्यावर २० हजारांचा होतो. ८० कलाकारांचा पीएफ, बोनस, विमा आहे. प्रीमियमवर महिन्याला दीड लाख रुपये खर्च येतो. दररोज चार ते पाच हजारांची वीज व जनरेटरसाठी ३,३६० रुपयांचे डिझेल लागते. याशिवाय पाणी, कलाकारांचे कपडे, तंबू बदलाचा एकूण खर्चाचा विचार केला तर दिवसाकाठी या सर्वाचा हिशेब १.५ ते १.७५ लाखांपर्यंत जातो.

मल्टिनॅशनल कुटुंब
नवी मुंबईतील ग्रेट बॉम्बे सर्कसचे मालक संजीव, दिलीप बालगोपाल मूळ केरळचे. त्यांचे काका के. एम. बालगोपाल आणि सांगलीचे बाबूराव कदम यांनी १९२० मध्ये सर्कस सुरू केली. आता कदम कुटुंबीय यातून बाहेर पडले. सर्कसमध्ये ८० कलाकार आहेत. त्यात इथिओपिया, केनिया आणि चीन येथील १२ सदस्य आहेत. उर्वरित सदस्य महाराष्ट्र, आसाम, मणिपूर, पंजाब, गुजरात, केरळ, बिहार, झारखंड, मध्य प्रदेश, तामिळनाडू, पश्चिम बंगाल आणि आंध्र प्रदेश येथील आहेत. याशिवाय कुत्रे, घोडे, उंट, पक्षी, इमू आहेत.
बातम्या आणखी आहेत...