आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीन दिवसांत बोनस, पगाराचे ~ ३८० कोटी बाजारात येणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - २५ ते २७ ऑक्टोबरदरम्यान सरकारी नोकर, शिक्षक आणि कंपन्यांमधील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बोनस, फेस्टिव्हल अॅडव्हान्सपोटी सुमारे ३८० कोटी रुपये औरंगाबादच्या बाजारपेठेत येत आहेत. या उलाढालीत सरकारी नोकरदारांचा वाटा ७० तर उर्वरितांचा ३० टक्के राहणार आहे. शहर जिल्ह्यात सुमारे एक लाख कंत्राटी कामगारांना बोनस, फेस्टिव्हल अॅडव्हान्स मिळणार नाही. अनेक प्रतिष्ठानांच्या चालकांनी त्यांच्या मर्जीनुसार एक ते दोन हजार रुपये देऊ केले आहेत.
वाळूज, शेंद्रा, पैठण आणि रेल्वेस्टेशन औद्योगिक वसाहतीतील कामगार (कायमस्वरूपी) अधिकारी, कर्मचाऱ्यांचा बोनस आणि पगार वाटप २५, २६ नोव्हेंबरला होणार आहे. त्यातून सुमारे पन्नास कोटी रुपये बाजारात येतील. त्यामुळे २६ पासून बाजारात गर्दी वाढणार आहे. सुधारित बोनस कायद्यानुसार किमान वेतनाशी बोनसची जोडणी करून किमान हजार रुपये बोनस दिला गेला. बजाजसारख्या मोठ्या कंपन्या अधिकाधिक २१ हजार ६५ रुपये बोनस देणार आहे. काही कंपन्यांचे व्यवस्थापन आणि कामगार संघटनांमध्ये बोनससाठी बैठका सुरू आहेत. ९५ टक्के कंपन्यांनी मूळ पगाराच्या ८.३३ टक्के प्रमाणे तर काही कंपन्यांनी २० टक्के प्रमाणे बोनस देण्याची तयारी केली असल्याचे ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले.

१८९ कोटी १३ लाख ५० हजार ९०३ रुपये महिन्याचा पगार
बजाज ठरली मोठा बोनस देणारी कंपनी : दरवर्षी कॉस्मो फिल्म कंपनीची सर्वाधिक बोनस देणारी कंपनी असते. मात्र, कंपनीने अद्याप बोनसचा आकडा जाहीर केला नाही. त्यामुळे यंदा बजाज ऑटोने जाहीर केलेला २१हजार ६५ रुपये हासर्वात मोठा ठरला आहे.

काही कंपन्यांचे बोनस असे
^पूर्वी किमानवेतन किंवा एक महिन्याचा पगार असा नियम होता. आता नव्या बदलानुसार किमान पगार ३,५०० वरुन हजार रुपये झाला आहे. किमान पगार प्रत्येक कंपनीत वेगळा आहे. काही मोठ्या उद्योगात किमान पगार १०,४०० असताना बोनस मात्र हजार रुपयांच्या आधारावर करण्यात आला आहे. मोजक्याच कंपन्यांनी नियमानुसार बोनस दिला आहे. अॅड.यतीन ठोळे, कामगार कायदे तज्ज्ञ

बोनस वाटप कायदा पूर्णपणे पाळला नाही
बोनस वाटप कायदा १९६५ प्रमाणे हजार ४०० इतका कमाल बोनस दिला जात होता. मात्र २०१५ साली यात बदल करून बोनसची सांगड किमान वेतनाशी घातली गेली. आजवर किमान वेतन हजार ५०० होते. ते सात हजार केले आहे. त्यामुळे किमान वेतन किंवा एका महिन्याचा पगार असा बोनस दिला जात आहे. ते पाहता मोठ्या कंपन्यांतील एका कामगाराचा किमान १६ हजार ८०० रुपये बोनस मिळणार आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा दुप्पट अाहे, असेे कामगार अधिकारी आर. के. परदेेशी यांनी सांगितले.

कायद्यातील बदलाने आकडा वाढला
शासकीय कर्मचाऱ्यांना जानेवारी २०१६ ते ३१ ऑगस्ट २०१६ या कालावधीतील सहा टक्के महागाई भत्त्याची थकबाकी पगार २५ ऑक्टोबर रोजी मिळणार असल्याचे वरिष्ठ कोषागार अधिकारी वंदन जोशी यांनी सांगितले. एसटीच्या ४००० कर्मचाऱ्यांना २५०० रु. अग्रीम तर अधिकाऱ्यांना ५००० रुपये, रेल्वेच्या ३५० कर्मचाऱ्यांना प्रत्येकी हजार रुपये बोनस मिळेल. जि. प.तील १२,५०० अधिकारी, कर्मचारी, शिक्षकांना त्यांना पगारापोटी ४५ कोटी मिळतील. राजपत्रित अधिकारी वगळता सर्वांना १० हजार अॅडव्हान्स मिळणार असून किमान ५००० जण त्याचा लाभ घेतील. . आरटीओतील २५ जणांना १० हजार अग्रीम मिळेल.
बातम्या आणखी आहेत...