आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद शहरात पुस्तकांची कॉपी करणार्‍या दुकानदारावर धाड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - कॉपीराइट कायद्याचे उल्लंघन करून पुस्तकांची कॉपी करत विद्यार्थ्यांना विकणार्‍या उमदे बुक सेंटरचे संचालक संतोष उमदे (42, औरंगपुरा) यांना पोलिसांनी बुधवारी दुपारी अटक केली. अंगुरीबागेतील त्यांचे गोडाऊन सील करत 44 हजारांची पुस्तके जप्त करण्यात आली.


उमदे हे अकरावी व बारावीतील भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि गणित या विषयांच्या भाग 1 व 2 ची पुस्तके मुंबईच्या मुलुंड परिसरातील टार्गेट पब्लिकेशनकडून खरेदी करतात. मात्र, गेल्या काही दिवसांपासून त्यांनी स्वत:च कंपनीचे नाव वापरून पुस्तके छापण्यास सुरुवात केली. जशीच्या तशी पुस्तके छापली जात असतानाच शहरातील काही विद्यार्थ्यांनी पुस्तकातील पाने उलटी असल्याची तक्रार टार्गेट पब्लिकेशनचे मालक दिलीप गंगारामाणी यांच्याकडे फोनद्वारे केली. त्यानुसार कंपनीचे संपादक तुषार चौधरी यांनी खात्री करत पोलिस आयुक्त संजय कुमार यांची भेट घेऊन उमदे यांच्याविरुद्ध तक्रार दिली. आज दुपारी आर्थिक गुन्हे शाखा आणि क्रांती चौक पोलिसांनी धाड मारत सातशे पुस्तके जप्त केली.