आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘ओपन डे’ निमित्त संशोधनाचा पेटारा उघडला, ग्रंथ प्रदर्शन सुरू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - ज्ञाननिर्मितीचे आणि ज्ञानाच्या नवनिर्मितीचे काम हे ग्रंथालयातून होत असते. वाचनाने माणसांना मोठे केले असून वाचनातूनच वंदनीय माणसाची जडण-घडण होते. त्यामुळे प्रचंड वाचन केले पाहिजे, असे प्रतिपादन विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. प्रल्हाद लुलेकर यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील ग्रंथालयाने आयोजित केलेल्या ग्रंथप्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी शुक्रवारी (दि.२३) ते बोलत होते. या वेळी कुलसचिव डॉ. गणेश मंझा, वाणिज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. वाल्मीक सरवदे, ग्रंथपाल डॉ.धर्मराज वीर होते. यावेळी डॉ. लुलेकर यांनी माहिती तंत्रज्ञान युगात ग्रंथालयाचे बदललेले स्वरूप महत्त्व विशद केले. डॉ. वाल्मीक सरवदे यांनी कोलंबिया विद्यापीठ आणि हॉर्वर्ड विद्यापीठ ग्रंथालयाचे अनुभव कथन केले, तर अध्यक्षीय समारोपात डॉ.गणेश मंझा यांनी विद्यापीठातील या दुर्मिळ ऐतिहासिक ग्रंथ संपदेचा लाभ विद्यार्थी संशोधक पालकांनी घ्यावा, असे आवाहन केले. डॉ.धर्मराज वीर यांनी ग्रंथालयांच्या बदललेल्या स्वरूपावर भाष्य केले. सूत्रसंचालन डॉ.शाईस्ता परवीन तर आभार सतीश पद्मे यांनी मानले.

विद्यापीठातील विविध विभागांच्या प्रयोगशाळांमधून होणारे संशोधन कार्य विद्यार्थ्यांच्या नवीन संकल्पनांतून साकारलेल्या प्रयोगांना मूर्त रूप मिळाले आहे. विद्यापीठात आयोजित "ओपन डे’निमित्त विद्यार्थ्यांच्या संशोधनाचा पेटाराच यानिमित्त उघडला गेला. अगामी दोन दिवस औरंगाबादकरांना विद्यापीठात मुक्त प्रवेश राहणार आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ५७ वा वर्धापन दिनानिमित्त कुलगुरू डॉ.बी.ए.चोपडे यांच्या संकल्पनेतून २१ ते २३ ऑगस्टदरम्यान "ओपन डे’चे आयोजन करण्यात आले आहे. ग्रंथप्रदर्शनाने या उपक्रमांचे उद्घाटन शुक्रवारी (दि. २१) सकाळी झाले. २२ २३ ऑगस्टलाही विविध कार्यक्रम होतील. सर्व विभागांमध्ये विविध प्रदर्शने भरणार असून शहवासीयांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन कुलगुरूंनी केले आहे.

पदार्थविज्ञान,‘कौशल्य’मध्ये विविध प्रयोग : पदार्थविज्ञानविभागात "इलेक्ट्राॅनिक वेलकम, ऑटोमॅटिक स्ट्रीट लाइट, क्लप स्वीच, हाय व्होल्टेज, सेफ्टी सर्किट’, पाण्याची बचत, अत्याधुनिक पत्रपेटी आदी प्रयोगांसह एकूण १२ माहितीपट दाखवण्यात येत आहेत. दीनदयाल उपाध्याय कौशल्य केंद्रात टुरिस्ट इन्फर्मेशन सेंटर स्थापन करण्यात आले आहे. पाणी जमिनीची माहिती देणारे यंत्र, स्मार्ट सिटी, ऑटोमोबाइल उद्योग, पाण्याची पातळी दाखवणारे यंत्र, ऑटोमॅटिक वॉटर लेव्हल सिस्टिम आदी प्रयोग येथे आहेत.

दुर्मिळवनस्पतींचे प्रदर्शन : वनस्पतिशास्त्रविभागात दुर्मिळ औषधी वनस्पतींचे प्रदर्शन मांडण्यात आले आहे. वनस्पतींचे टिश्यू कल्चर, वाढ आदी प्रयोगातून मांडण्यात आले आहे. घरावरील शेती, मातीशिवाय शेती, विविध आजारांसाठी वनस्पतींचा वापर आदींची माहिती देण्यात येत आहे.

‘सायन्स ऑन व्हील्स’चे आज उद्घाटन
मानवविकास मिशनच्या ४५ लाख निधीतून विद्यापीठाला फिरती प्रयोगशाळा मिळाली आहे. कोलकाता येथून सदर गाडी विद्यापीठात पोहोचली आहे. हसत-खेळत विज्ञानअंतर्गत प्राप्त या उपक्रमाचे उद्घाटन मिशनचे प्रमुख डॉ. भास्कर मुंडे यांच्या हस्ते शनिवारी वाजता मुख्य इमारतीसमोर होणार आहे. कुलगुरू डॉ. चोपडे अध्यक्षस्थानी राहतील. या गाडीत मानवाच्या पंच इंद्रियांची सविस्तर माहिती, मानव उत्क्रांती, गणित, विज्ञान, खगोलशास्त्र आदी २० प्रयोग मांडले आहेत, असे डॉ. मीना पाटील यांनी सांगितले.

दोन दिवस प्रदर्शन, सर्वांसाठी खुले
ग्रंथालयातीलमुख्य सभागृहात सुरू असलेले हे ग्रंथप्रदर्शन शनिवार रविवारी खुले असेल. यावर्षी जगातील ख्यातनाम, तसेच भारतातील सर्व राष्ट्रपुरुषांचे चरित्र आणि आत्मचरित्रात्मक हजारो ग्रंथ प्रदर्शनात मांडले जाणार आहेत. या शिवाय राजे शामराज राय बहादूर यांचे दुर्मिळ हस्तलिखित संग्रह आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाक्षरित भारतीय राज्यघटनेवरील ग्रंथ हे ग्रंथप्रदर्शनाचे खास आकर्षण राहणार आहे. ग्रंथालयातील सी.डी., डी.व्ही.डी ग्रंथालय आणि ग्रंथालयाची डाक्युमेंटरी याप्रसंगी सर्वांना पाहता येईल, असे ग्रंथपाल डॉ.धर्मराज वीर यांनी कळवले आहे.

अंधश्रद्धा निर्मूलनाचे प्रयोग
रसायनशास्त्रविभागात भोंदू बाबा लोकांना कसे फसवतात हे प्रयोगासह दाखवण्यात आले आहे. यामध्ये नारळास आग लावणे, लिंबातून रक्त काढणे यासह अनेक प्रयोगांचा समावेश आहे. टोमॅटोमधून विजेची निर्मिती हा प्रयोगही लक्षवेधक ठरला आहे.

प्राणिशास्त्र विभागात गर्दी
प्राणीशास्त्रविभागातील संग्रहालयास दिवसभरात हजारहून अधिक लोकांनी भेट दिली. या विभागात मृत प्राणी, पक्ष्यांचे अवशेष मांडले आहेत. तसेच मधुमक्षिका पालन रेशीम उद्योगाचे प्रयोगही मांडले आहेत.

स्मार्ट सिटीचा प्रयोग
केंद्रसरकारच्या स्मार्ट सिटी प्रकल्पात औरंगाबादचा समावेश असावा यासाठी प्रयत्न केले जात आहेत. या योजनेची माहिती प्रयोगाच्या माध्यमातून संगणकशास्त्राच्या विद्यार्थ्यांनी दिली आहे. या विभागात रिमोट सेन्सिंग, डाटा अॅनालिसिस आदी प्रयोग आहेत. विभागप्रमुख डॉ.रत्नदीप देशमुख, डॉ.एस.सी.मेहरोत्रा यांच्यासह प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले आहे. "बीसीय्ूडी’चे संचालक डॉ. के. व्ही. काळे यांनी या प्रयोगांची पाहणी केली.