आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादचा युवक नांदगावात बुडाला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांदगाव - मित्राला वाचवण्यासाठी गेलेल्या औरंगाबादेतील महाविद्यालयीन युवकाचा रविवारी चांदेश्वरी धबधब्याच्या पायथ्याशी असलेल्या डोहात बुडून मृत्यू झाला. शैलेश उत्तमराव जाधव (रा. बंजारा कॉलनी, औरंगाबाद) असे मृताचे नाव आहे.

शैलेश याच्यासह सागर बालाजी जवडगावकर, परमजितसिंग राजिंदरसिंग डोडी, प्रथमेश अनिल दवडगावकर, महेश चंद्रकांत टाक, तुषार जयंत तोत्रे हे मित्र रविवारी सकाळी 11 च्या सुमारास दुचाकीवरून औरंगाबादहून निघाले होते. वाटेत चांदेश्वरी देवीच्या दर्शनासाठी धबधब्याजवळ थांबले. याच वेळी सागर जवडगावकर हा पाय धुण्यासाठी पाण्यात उतरला असता तो पडला. त्याला वाचवण्यासाठी शैलेशने पाण्यात उडी घेतली. याच वेळी एका स्थानिकानेही उडी घेऊन सागरला पाण्याबाहेर काढले. मात्र शैलेशचा बुडून मृत्यू झाला. या घटनेची माहिती नांदगाव पोलिसांना देण्यात आली.