आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मग्गीरवार यांच्या पुस्तकाचे प्रकाशन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- ख्यातनाम ज्योतिर्विद आणि वास्तू महर्षी पं. य. न. मग्गीरवार यांनी लिहिलेल्या ‘वास्तू सिम्प्लिफाइड’ या वास्तुशास्त्रावर आधारित अभ्यासपूर्ण ग्रंथाचे नुकतेच आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
बंगळुरू येथे आर्ट ऑफ लिव्हिंग आर्शमात झालेल्या एका भव्य कार्यक्रमात हा प्रकाशन सोहळा झाला.
वास्तुशास्त्रासंदर्भातील अनेक प्राचीन ग्रंथांचे सार असणार्‍या या ग्रंथात वास्तुशास्त्राचे प्रत्येक सूत्र श्लोकाचा संदर्भ देत मांडले आहे. भारतीय वास्तुशास्त्रासंबंधी सविस्तर विवेचन करणारा हा ग्रंथ इंग्रजीत आहे. पं. य. न. मग्गीरवार हे ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्राचे गाढे अभ्यासक असून त्यांना नुकतीच वास्तू महर्षी ही पदवी देण्यात आली आहे. बंगळुरूतील प्रकाशन सोहळ्याला आर्ट ऑफ लिव्हिंगचे वरिष्ठ शिक्षक अंकुश भालेकर, नरेन उमरीकर व अभिजित मग्गीरवार यांची उपस्थिती होती.