आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुस्तक वाचायचेय, वेळ नाही ? आॅडिओ ऐका! वाचनाची गोडी वाढवण्यासाठी पुस्तकवेड्याचे अॅप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - जाडजूड पुस्तके वाचायची इच्छा आहे, पण वेळ नाही अशी अवस्था असणाऱ्यांना आता मोबाइलवर या पुस्तकांचा ध्वनी व अक्षररूपात सारांश मोबाइलवर उपलब्ध करून देण्यात आले आहे. न वाचलेल्या पुस्तकांबाबत व्हाॅट्सअॅपवरून सारांश देण्याच्या कल्पनेतून ठाण्याच्या अमृत देशमुख या युवकाने आता चक्क याचे अॅपच तयार केले अाहे. ५ महिन्यांत तब्बल १५ हजार जणांनी ते डाऊनलोड केले आहे. आठवड्याला एका बेस्टसेलर पुस्तकाचा सारांश त्यावर प्रकाशित केला जातो.
ठाण्यात राहणाऱ्या ३४ वर्षीय चार्टर्ड अकाउंटंट अमृत देशमुख यांनी हा मित्रांसाठी सुरू केलेला उपक्रम वर्षभरातच चांगलाच नावारूपाला आला अाहे.
देशमुख म्हणाले, आठवड्याला एक पुस्तक वाचायचा नवीन वर्षाचा संकल्प दरवर्षी करायचो, पण तो पुरा व्हायचा नाही. एकदा मित्रासोबत मूव्हीला गेलो असताना १५-२० मिनिटे वेळ होता. तेव्हा त्याला ‘सेव्हन हॅबिट्स आॅफ हायली इफेक्टिव्ह पीपल’ या स्टीफन कोवीच्या गाजलेल्या पुस्तकाचा सारांश सांगितला. त्याने हा सारांश व्हाॅट्सअॅपला शेअर करायची आयडिया दिली. त्यातून हा उपक्रम सुरू झाला आणि आठवड्याला एक पुस्तक वाचण्याचाही संकल्प पूर्ण झाला. देशमुख म्हणाले, बुकलेट नावाने १५ आॅगस्ट २०१५ राेजीउर्वरित. पान १०
व्हाॅट्सअॅप ग्रुप सुरू केला व त्यावर दर बुधवारी एका पुस्तकाचा लिखित सारांश टाकायला सुरुवात केली. पाहता पाहता एक हजारहून अधिक सदस्य झाले. ग्रुप वाढत गेला. याच काळात सर्व्हे केला, त्यात मजकूर वाचण्याचाही लोकांना कंटाळा येत असल्याचे समोर आले, मग आॅडिओची कल्पना आली. नंतर एक मायक्रोफोन विकत घेतला आणि पुस्तकाचा सारांश रेकाॅर्ड केला. २० मिनिटांची ही आॅडिओ क्लिप शेअर केली आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. काही महिन्यांतच १० हजार जणांना आॅडिओ आणि मजकूर असे सारांश शेअर करावे लागले.
अॅपशिवाय पर्याय नव्हता :
व्हाॅट्सअॅप ग्रुपच्या सदस्यांची संख्या २५० च असल्याने ग्रुपची संख्या वाढवावी लागायची. त्यात वेळ जायचा. यावर पर्याय म्हणून अँड्राॅइडसाठी अॅप बनवण्याचा विचार आला व मित्रांच्या मदतीने ते तयारही झाले. याच वर्षी २३ एप्रिलला जागतिक पुस्तकदिनी ते लाँच झाले. आतापर्यंत १५ हजार जणांनी ते डाऊनलोड केले आहे. लवकरच या अॅपचे आयओएस व्हर्जनही येत असल्याचे देशमुख यांनी सांगितले.
सध्या फक्त बेस्ट सेलर्स
देशमुख म्हणाले की, मला प्रेरक, व्यक्तिमत्त्व विकासासाठी उपयुक्त, मॅनेजमंेट कौशल्य आदी विषयांवरची इंग्रजी बेस्ट सेलर्स वाचायची आवड आहे. त्यामुळे त्याच पुस्तकांचे सारांश देत आहे. आता लोक मराठी व हिंदी पुस्तकांसाठी मागणी आहे. लवकरच ते सुरू करणार आहे. तसेच काही लेखक तर आपली पुस्तके पाठवून याचाही सारांश येऊ द्या, असा आग्रह धरत आहेत.
कोण आहेत वाचक?
देशमुख म्हणाले की, या सारांशांमुळे चटकन पुस्तक कळून जाते. त्यामुळे याला प्रतिसादही चांगला मिळत आहे. अगदी बिल्डर, अधिकारी, सेलिब्रिटीज, तरुण, तरुणी, गृहिणी असे सगळ्या स्तरातील ऐकणारा वाचक मिळाला आहे. द माॅन्क व्हू सोल्ड हिज फेरारी, रिच डॅड पुअर डॅड, सेव्हन हॅबिट्स आॅफ हायली इफेक्टिव्ह पीपल, बिझनेस महाराजाज, द बर्थ आॅर्डर बुक, एकर्स आॅफ डायमंड्स अशी जगप्रसिद्ध पुस्तके वाचून त्याचे सारांश शेअर केले आहेत. आज अॅपला १५ हजार जणांनी डाऊनलोड केले आहे. हा आकडा १ लाखापर्यंत न्यायचा त्यांचा मनोदय आहे.
बातम्या आणखी आहेत...