आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनुवादित साहित्याचा खजिना शहरवासीयांसाठी उपलब्ध

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - वाचनप्रेमींना नेहमीच ओढ असते ती नवनवीन साहित्याची, नवीन विषयांच्या पुस्तकांची. त्यांची हीच भूक भागवण्यासाठी अनुवादित पुस्तके त्यांच्या भेटीला आली आहेत.
शहरातील बलवंत वाचनालयात सध्या फेमस बुक्सतर्फे पुस्तकांचे प्रदर्शन सुरू आहे. 75 प्रकाशकांची मराठी, हिंदी, इंग्रजी भाषांतील जवळपास अडीच हजारांहून अधिक पुस्तके या प्रदर्शनात उपलब्ध आहेत. त्यात धार्मिक, आध्यात्मिक, ज्योतिष, चरित्र, पौराणिक, आत्मचरित्र, कथा, कादंबरी, नाटक, खेळ, चित्रकला, स्पर्धा परीक्षा आदी विविध विषयांवरील पुस्तकांचा समावेश आहे. तसेच ‘लाल किताब’ हा ज्योतिषशास्त्रावर आधारित 2000 रुपयांचा संच आणि ‘रावण संहिता’चे हिंदी हस्तलिखित उपलब्ध आहे.
चेतन भगतचे नवे पुस्तक ‘रेव्ह 20-20’, ऑक्सफर्ड हिंदी-मराठी डिक्शनरी, रोहान बर्न यांचे ‘हिटलर’, ‘स्टीव्ह जॉब्ज एक झपाटलेले तंत्र’, तुषार गांधी लिखित ‘लेट्स किल गांधी’, ‘टेल्स फॉर्म द सिक्रेट’, जेम्स बाँडचे ‘इयान फ्लेमिंग’, ‘फॉर्म रशिया विथ लव्ह’, ‘एव्हरीथिंग हॅपन्स फॉर अ रीझन’ आदींसह अन्य पुस्तकांचाही यात समावेश आहे.