आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Boycott News In Marathi, Teacher Boycott On 12 Th Exam, Divya Marathi

एसएससी बोर्डाच्या सभागृहात पर्यवेक्षकांची बैठक ‘जुक्टा’ने उधळली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- कनिष्ठ महाविद्यालय प्राध्यापक संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी (जुक्टा) पर्यवेक्षकांची बैठक उधळून लावली. प्रलंबित मागण्या मान्य करा अन्यथा उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकण्यात येईल असा इशारा दिला.
बाराची परीक्षा सुरू असून शुक्रवारी सकाळी 11 वाजता एसएससी बोर्डाच्या सभागृहात पर्यवेक्षकांची बैठक आयोजित केली होती. दरम्यान, जुक्टाच्या पदाधिकार्‍यांनी घोषणा देत आतमध्ये प्रवेश केला. आधी मागण्या मान्य करा नंतरच बैठक घ्या, असे म्हणत बैठक उधळून लावली. मागण्याचे निवेदन मंडळाच्या अध्यक्षांना देण्यात आले. त्यानंतर बोर्डाबाहेर जोरदार नारेबाजी करण्यात आली.

परीक्षा सुरू होण्यापूर्वीच संघटनेने बहिष्कार टाकला होता. प्रात्यक्षिक परीक्षा झाल्यानंतर आपल्या काही मागण्या मान्य करण्यात येतील, असे आश्वासन शासनाने दिले होते. त्या आश्वासनाची पूर्तता झाली नाही म्हणून जुक्टाने आंदोलन तीव्र केले आहे.

बोर्डाने महाविद्यालयांत उत्तरपत्रिका पाठवल्यास त्या तपासणीसाठी घेतल्या जाणार नाहीत, असा इशारा देण्यात आला. आंदोलनात प्रा. संभाजी कमानदार, डॉ. शिवानंद भानुसे, प्रा. रमाकांत गायकवाड, प्रा.भाऊसाहेब शिंदे, प्रा. अतुल बोराडे, प्रा. आर. एम. चव्हाण, प्रा. व्ही. डी. म्हस्के, प्रा. एस. आर.कडूस्कर, प्रा. एस. डी. आढाव, प्रा. भगवान इंगळे यांचा समावेश होता.

बहिष्कार टाकता येणार नाही
उत्तरपत्रिका तपासणीवर संघटनेला बहिष्कार टाकता येणार नाही. त्यांची त्याच कामासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. जे शिक्षक उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकतील अशांवर कारवाई करण्याची शिफारस शिक्षण विभागाकडे केली जाईल. सुखदेव डेरे, विभागीय अध्यक्ष, एसएससी बोर्ड.