आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्राह्मण उद्योजकांचे देशाच्या विकासात मोठे योगदान

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - देशासह महाराष्ट्राच्या उद्योग क्षेत्रात ब्राह्मण उद्योजकांनी मोठे योगदान दिले आहे. किर्लोस्कर, गरवारेपासून ते अलीकडच्या काळातील औरंगाबादचे मोठे उद्योजक श्रीकांत बडवे या उद्योजकांची नावे घेताना अभिमान वाटतो, असे गौरवोद््गार उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी ब्रह्माेद्योग संमेलनाच्या उद््घाटनप्रसंगी काढले.
बीड बायपासवरील गुरू लॉनवर शनिवारपासून ब्राह्मण समाजातील उद्योजकांचे संमेलन सुरू झाले. राज्यातील नामवंत उद्योजकांनी यात सहभाग घेतला आहे. याचे उद््घाटन उद्योगमंत्री देसाई यांनी केले. व्यासपीठावर खासदार चंद्रकांत खैरे, आमदार संजय शिरसाट, अतुल सावे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, पुणे येथील चितळे समूहाचे संचालक नानासाहेब चितळे, उद्योजक श्रीकांत बडवे, नगरसेवक राजू वैद्य, ब्राह्मण महासंघाचे अ.भा. अध्यक्ष गोविंद कुलकर्णी उपस्थित होते. देसाई यांनी वेदमंत्रांच्या घोषात दीपप्रज्वलन केले. राज्यातील ब्राह्मण उद्योजकांनी देशासाठी दिलेले योगदान विशद करताना ते म्हणाले, किर्लोस्करांच्या इंजिनला जगात तोड नाही. औरंगाबादचे श्रीकांत बडवे यांनी तर शून्यातून दोन हजार कोटींची उलाढाल निर्माण केली.

संमेलनात १५० उद्योजकांनी आपले स्टॉल लावले आहेत. चितळे समूहाचे प्रमुख बी.जी. चितळे यांचा सहकुटुंब सत्कार करण्यात आला. रविवारी दिवसभर महत्त्वाचे चर्चासत्रे होतील.
मार्गदर्शन करताना सुभाष देसाई. व्यासपीठावर खा. चंद्रकांत खैरे, आमदार अतुल सावे, संजय शिरसाट, अंबादास दानवे, नानासाहेब चितळे आदी.

स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ द्या
अ.भा. ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष गोविंद कुलकर्णी म्हणाले, राज्याचे मुख्यमंत्री ब्राह्मण असून उपयोग नाही. कारण त्यांनी आमची भेट नाकारली. ब्राह्मण समाजासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे, ब्राह्मण तरुणांना नोकरी देता येत नसेल तर उद्योगासाठी कर्ज उपलब्ध करून द्यावे, पुरोहितांना महिना पाच हजार मानधन द्यावे, अशा मागण्या त्यांनी सरकारकडे केल्या.
बातम्या आणखी आहेत...