आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विमानतळाच्या पार्किंगमध्ये पेट्रोल, कारच्या लोगोची चोरी; महागड्या गाड्यांचे सुटे भाग चोरीच्या तक्रारी वाढल्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - चिकलठाणा विमानतळाच्या पार्किंगमधील कर्मचार्‍यांबाबत आतापर्यंत ग्राहकांशी उद्धट बोलणे, जास्तीचे दर आकारणे अशा तक्रारी येत होत्या. आता मात्र पार्किंगमधून दुचाकी वाहनांचे हॉर्न, इंडिकेटर आणि पेट्रोल, तर चारचाकी वाहनांचे लोगो चोरीला जाण्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. विमानतळावर काम करणार्‍या विविध कंपन्यांच्या कर्मचार्‍यांनी या तक्रारी करूनही विमानतळ प्रशासन याबाबत दखल घेताना दिसत नाही.
व्हीआयपी किंवा व्हीव्हीआयपींना विमानतळाच्या पार्किंगमध्ये धक्कादायक अनुभव येत आहेत. शहरातील काही उद्योजक आणि हज यात्रेकरूंनीदेखील विमानतळ प्रशासनाकडे तोंडी तक्रारी केल्या आहेत. मात्र, कोणाचीही तक्रार गांभीर्याने घेतली गेली नाही. पार्किंगमधून दुचाकी गाड्यांचे हॉर्न, इंडिकेटर आणि पेट्रोल चोरीचे प्रमाण वाढत असल्याचे विमानतळ कर्मचारी सांगतात.

याबाबत कंत्राटदार रफी सौदागर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी पार्किंगमध्ये कुठल्याही प्रकारची चोरी होत नसल्याचे सांगितले. शिवाय कर्मचार्‍यांना ग्राहकांशी नम्रतेने बोलण्याचे प्रशिक्षण दिल्याचे सांगितले.
दोन वर्षांपासून चोरीच्या तक्रारी
दोन वर्षांपासून विमानतळाच्या पार्किंगमधून महागड्या चारचाकी गाड्यांचे लोगो चोरीला जाण्याचे प्रकार वाढले आहे. मात्र, याबाबत पोलिसांत कोणीही तक्रार दिलेली नाही. याशिवाय दुचाकीचे सीट फाडणे, इंडिकेटर तोडणे, गाडी साखळीने बांधून ठेवणे असे प्रकारही होत आहेत. याबाबत राजकीय नेते, उद्योजक आणि सामान्य प्रवाशांनी तोंडी तक्रारी करूनही विमान प्राधिकरणाचे व्यवस्थापक डी. जी. साळवे दखल घेत नसल्याचे निदर्शनास आले.

उद्धट वर्तणूक
४ विमानतळावर पार्किंग कर्मचार्‍यांकडून उद्धट वर्तणुकीचा अनुभव अनेकदा आला आहे. याबाबत आम्ही साळवे यांच्याकडे तक्रारही केली. व्हीव्हीआयपी मंडळी विमानतळावर येतात. मात्र, त्यांचा हा अनुभव शहराची प्रतिमा खराब करतो. -
प्रशांत देशपांडे, उद्योजक

पंतप्रधानांना पत्र

हज यात्रेकरूंच्या नातेवाइकांना काही मिनिटांसाठी पार्किंगचे पैसे द्यावे लागतात. शिवाय योग्य वागणूकही मिळत नाही. याबाबत आमच्या संस्थेने पंतप्रधानांना पत्र लिहिले आहे. - मोहसीन अहमद, अध्यक्ष, जनकल्याण समिती

एअरपोर्र्ट अथॉरिटी काय करते?

४चोरीचे आणि गैरवर्तणुकीचे प्रकार घडत असताना एअरपोर्ट अथॉरिटी काय करत आहे? या प्रश्नावर मनविसेकडून आंदोलन केले जाईल.
अमोल खडसे, जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना