आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाहतुकीचे नियम मोडले; ११ जणांवर गुन्हे दाखल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - नियम धाब्यावर बसवून वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनधारकांना पोलिसांनी गेल्या काही दिवसांपासून खाक्या दाखवण्यास सुरुवात केली आहे. अशा वाहनधारकांवर कलम २८३ नुसार गुन्हा दाखल करून तसेच न्यायालयासमोर उभे करून त्यांची गाडी जप्त करण्याची मोहीम पोलिसांनी सुरू केली आहे. २९ सप्टेंबर रोजी विविध पोलिस ठाण्यांच्या हद्दीत अशा प्रकारचे ११ गुन्हे नोंदवण्यात आले.
रस्त्यात चारचाकी उभी करणे किंवा हातगाडी उभी करून वाहतूक कोंडीस कारणीभूत ठरणाऱ्या वाहनधारकांची गय केली जाणार नसल्याचे वाहतूक पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. शहरात पार्किंगसाठी ज्या जागा नेमून दिल्या आहेत अशाच जागांवर गाडी पार्क करावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे दसरा आणि दिवाळीच्या खरेदीसाठी जाणाऱ्या वाहनधारकांनी या गोष्टीचा काळजीपूर्वक विचार करावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. गेल्या १५ दिवसांत नियमाचे उल्लंघन करणाऱ्या दोनशेपेक्षा अधिक वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली.

वाहतूक कोंडीची ठिकाणे
शहरात अनेक ठिकाणी रिक्षाचालकांनी स्वयंघोषित थांबे तयार केले आहेत. अनेक ठिकाणी भाजी मंडई तयार झाली आहे. यामुळे वाहतुकीची कोंडी निर्माण होते. मुकुंदवाडी, टीव्ही सेंटर, जटवाडा रोड, औरंगपुरा, क्रांती चौक, जळगाव टी पॉइंट, गुलमंडी, उस्मानपुरा, जालना रोड, बीड बायपास, देवळाई चौक, गजानन महाराज मंदिर चौकात होणाऱ्या कोंडीवरदेखील कारवाई सुरू आहे. याशिवाय शहरात प्रमुख चौकात सीसीटीव्ही बसवण्यात आले आहे. त्यांच्या मदतीनेदेखील कारवाई सुरू आहे.

येथे झाली कारवाई
१.हुसेनछोटूमियाँ शेख इरफान शेख नजीर यांनी धूत हॉस्पिटलजवळ त्याची तीनचाकी रिक्षा (एमएच २० बीटी ८४२२) रस्त्यात उभी करून वाहतुकीस अडथळा केला म्हणून हवालदार शिवाजी बनसोड स्वप्निल वाणी यांनी त्यांच्यावर सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

२.क्रांतीचौक आणि वेदांतनगर भागात रिक्षाचालक मनोज धनपटे (रिक्षा क्र. एमएच २० डीसी १९८९), समाधान रघुनाथ लावणे (रिक्षा क्र. एमएच २० बीसी ४४१४) आणि हमीद पठाण अहमद पठाण (रिक्षा क्र. एमएच २० डीसी ३९२१) यांच्यावर कारवाई करत गुन्हा दाखल करण्यात आला.

३.उस्मानपुराभागातील भाजी मंडईत रिक्षाचालक मुक्तार शेख याने त्याची रिक्षा (एमएच २० बीटी ५४६२) रस्त्यावर उभी केल्यामुळे उपनिरीक्षक धरमसिंग सुंदरवडे यांनी कारवाई करत उस्मानपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

४.जवाहरनगरपोलिस ठाण्याच्या हद्दीतील अंडा आॅम्लेटची गाडी चालवणारा दीपक आटोळे (रा. गारखेडा), गौतम नरवडे, बन्सी हरकळ (रा. गजानननगर), दीपक सोमनाथ जोंधळे (रा. बौद्धनगर) याच्यावर पोलिस हवालदार अब्दुल अजीज अब्दुल गणी, साहेबराव जाधव यांच्यासह पथकाने कारवाई केली.
बातम्या आणखी आहेत...