आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कन्हैय्याकुमार लवकरच येणार महाराष्ट्रात, औरंगाबादमध्ये होणार जाहीर सभा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात कन्हैय्याकुमार औरंगाबादेत येणार आहे. - Divya Marathi
ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात कन्हैय्याकुमार औरंगाबादेत येणार आहे.
औरंगाबाद - जेएनयू विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष कन्हैय्याकुमार लवकरच औरंगाबादमध्ये येणार आहे. औरंगाबादमधील डाव्या संघटना, आंबेडकरवादी, लोकशाहीवादी, धर्मनिरपेक्ष नागरिक, विद्यार्थी, युवक, युवती या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहाण्याची शक्यता आहे. 
 
महाराष्ट्रात कन्हैय्याकुमार फार कमी वेळा आला आहे. मुंबई, पुणे येथे त्याच्या सभा झाल्या आहेत. याच वर्षी एप्रिल महिन्यात तो नागपूरला आला होता. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी येण्याच्या एक दिवस आधी त्याच्या 'बिहार ते तिहार' या मराठी अनुवादित पुस्तकाचे प्रकाशन झाले होते. यावेळी त्याने समाजातील अनेक वर्गांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सद्यस्थितीत पतंजलीचा फेसवॉश लावला नाही तरी देशद्रोह ठरेल, असा चिमटा सत्ताधाऱ्यांना काढला होता.
औरंगाबादमधील डाव्या आणि आंबेडकरवादी संघटनांनी कन्हैय्याकुमारला निमंत्रित केले आहे. साधारण ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात तो येण्याची शक्यता आहे. हा कार्यक्रम मोकळ्या मैदानावर होणार की बंद सभागृहात याची सर्वांना उत्सूकता आहे.
 
पुढील स्लाइडमध्ये, प्रसिद्ध आहे कन्हैय्याकुमारची ही घोषणा... 
बातम्या आणखी आहेत...