आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रेकअपमुळे आयुष्य उद्ध्वस्त झाले, मला जगण्यात रस नाही; पथनाट्यातून संदेश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- ‘मला परीक्षांमध्ये सतत अपयश येते आहे. शिवाय ज्या मुलीवर मी जिवापाड प्रेम केले तिनेही माझी साथ सोडली. आता आयुष्यात जगण्यासारखे काहीच उरले नाही. मला आयुष्य नको...’ हे संवाद आजकाल अनेक तरुणांकडून ऐकायला मिळतात. मात्र, हे संवाद कुणी तरुणाने बोललेले नसून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या वतीने जागतिक नैराश्य दिनानिमित्त आयोजित पथनाट्यातील आहेत.
 
पीएसएम विभागाच्या वतीने हे आयोजन करण्यात आले होते. जागतिक आरोग्य संघटनेने यंदाचे वर्ष नैराश्य या आजारासाठी दिले आहे. जगातील दुसऱ्या क्रमांकाचा, तर भारतातील पहिल्या क्रमांकाचा आजार असलेल्या नैराश्यावर आता युद्धपातळीवर जनजागृतीची गरज आहे. यासाठी घाटी रुग्णालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. 

पथनाट्यासोबतच पोस्टर प्रदर्शनही भरवण्यात आले होते. महेश बन याने दिग्दर्शन केले. राहुल बेंद्रे, हेमंत भडंगे, ऋत्विक मोराळे, सुशील शिंदे, किरण आल्हाद, आदित्य सोनार, तृप्ती पोपळकर, मधुरा न्यायाधीश, अंकिता शेळके, श्वेता राठोड, दिव्या इंगळे, रोहिणी देशमुख, श्रुती देवरे, सुप्रिया बनसोडे, विष्णू खंदारे यांनी उत्तमरीत्या समाजातील तीन वेगवेगळ्या गटांचे प्रतिनिधित्व केले. एका सामान्य पुरुषाला येणारे नैराश्य, महाविद्यालयीन तरुणीचे नैराश्य आणि युवकाचे नैराश्य यामध्ये तिघांचा प्रतिसाद, त्यांच्या मनात चालणारे विचार आणि त्यांचे वर्तन दाखवण्यात आले. 

या वेळी घाटीचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के, शासकीय कर्करोग रुग्णालयाचे विशेष अधिकारी डॉ. अरविंद गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. 

नैराश्याची लक्षणे 
- झोप लागत नाही 
- जेवण करणे 
- एकटेपणा, चिडचिड 

संवादातून मोकळा मार्ग 
नैराश्यग्रस्तव्यक्तीशी संवाद साधून त्याला आशेचा मार्ग दाखवायला हवा. त्याला पूर्णपणे मनमोकळे बोलते करायला हवे. समस्येतून बाहेर पडण्यासाठी सकारात्मक संवादातून ऊर्जा दिल्यास हे लोक लवकरात लवकर नैराश्यातून बाहेर येतात. त्यांच्या चुकांवर बोट ठेवण्यापेक्षा त्यांच्यातील गुणांचे कौतुक करून त्यांना प्रेरणा दिल्यास यावर मात शक्य आहे. 
बातम्या आणखी आहेत...