आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन लाखांची लाच घेणाऱ्या लेखा परीक्षकाचे एसीबीकडून ‘ऑडिट’

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - गृहनिर्माण सोसायटीला दिलेली नोटीस परत घेण्यासाठी तसेच बांधकाम कंत्राट रद्द करण्यासाठी लाच मागणाऱ्या जिल्हा सहकारी संस्थांच्या विशेष लेखा परीक्षकाला (ऑडिटर) एसबीच्या पथकाने दोन लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. प्रताप माधवराव शिंदे असे आरोपीचे नाव आहे. मंगळवारी सकाळी साडेबाराच्या सुमारास गारखेडा येथील त्याच्या मित्राच्या खासगी कार्यालयातच एसीबीने लाचेच्या रकमेचे ‘ऑडिट’ केले. लाचेची रक्कम घेण्यासाठी मदत करणारा त्याचा मित्र सुदीप देविराज हिवराळे यालाही अटक करण्यात आली. या दोघांच्या विरोधात मुकुंदवाडी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एका बांधकाम व्यावसायिकाला तिरुमला हाऊसिंग सोसायटीची घरे बांधण्याचे कंत्राट मिळाले आहे. मार्च महिन्यात शिंदे याने या सोसायटीचेऑडिट केले. त्यावेळी काही व्यवहार धनादेशाद्वारे होता रोखीने झाले होते. शिंदे याने या त्रुटींबाबत सोसायटीला नोटीस बजावून खुलासा करण्याचा सूचना केल्या. त्यामुळे सोसायटीचे अध्यक्ष हे शिंदे यांना भेटण्यासाठी गेले. तेव्हा मी अध्यक्षांशी बोलणार नाही. कंत्राटदराला पाठवा, असे शिंदे यांनी सांगितले. त्यानुसार कंत्राटदराने शिंदेची भेट घेतली असता त्याने अहवाल सोसायटीच्या बाजूने हवा असल्यास आणि बांधकामाचे कंत्राट रद्द करण्यासाठी पाच लाखांची मागणी केली. कंत्राट हातून जाईल या भीतीने कंत्राटदाराने शिंदेला अडीच लाख रुपये दिले. मात्र उर्वरित अडीच लाखांसाठी शिंदेकडून सतत मागणी होत होती. कंत्राटदाराची लाच देण्याची इच्छा नसल्यामुळे त्यांने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला. मंगळवारी एसीबीने शिंदे आणि त्याचा सहकारी हिवराळे याला लाचा घेताना पकडले. एसबीचे उपअधीक्षक विवेक सराफ आणि प्रकाश कुलकर्णी यांच्या पथकाने ही कारवाई केली. निरीक्षक एस.एस शेगोकर, प्रमोद पाटील, कैलास कामठे, संदीप आव्हाळे, अश्वलिंग होनराव , अजय आवले, दीपक देशमुख, मंगल दिवे, दिलीप राजपूत, संदीप चिंचोले यांचा या पथकात समावेश होता. अधीक्षक डॉ. श्रीकांत परोपकारी आणि अपर पोलिस अधीक्षक ज्ञानदेव गवारे यांनी या पथकाला मार्गदर्शन केले.

पथकाला फिरवले
आपल्यावर ट्रॅप लागू शकतो, अशी शंका शिंदे याला होती. त्यामुळे तक्रारदाराकडून पैसे घेण्यास त्याने मुद्दाम दोन दिवस टाळाटाळ केली. तक्रारदारच्या मागे कोणी अधिकारी येता आहेत का, हे तो पाहात होता. अखेर पैसे घ्यायचे तर आताच घ्या, नाही तर दिवाळीनंतर मिळतील, असे तक्रारदाराने सांगितल्यानंतर शिंदे याने मित्राच्या गारखेडा येथील कार्यालयात पैसे घेण्याचे ठरवले. हिवराळे याला पैसे घेण्यासाठी पाठवले. त्याच वेळी तो सापळ्यात सापडला.

बातम्या आणखी आहेत...