आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हळदीच्या दिवशीच सॉप्टवेअर इंजिनिअर नवरदेवाची आत्महत्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पैठण - हळदीच्या दिवशीच भावी नवरदेवाने शेतात दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गेवराई तालुक्यातील पांचाळेश्वर येथे रविवारी घडली. तरुणाचा विवाह सोमवारी(दि. १४) पैठण तालुक्यातील वाहेगाव येथे होणार होता.

कृष्णा अर्जुन राऊत (२२) हा बुलडाणा येथे सॉप्टवेअर इंजिनिअर म्हणून नोकरीस होता. वाहेगाव येथे सोमवारी विवाह आणि रविवारी हळदी समारंभ होता. कृष्णाने सकाळी पांचाळेश्वर शिवारातील शेतात आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्तेचे कारण समजू शकले नाही.
बातम्या आणखी आहेत...