आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पूल नसल्याने चिमुकल्यांना नाल्यातून गाठावी लागते शाळा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंंगाबाद - मुकुंदवाडी परिसरातील संतोषीमातानगरात आधी नाल्यावर पूल बांधला. त्याला जागोजागी भगदाडे पडली. त्याच्या दुरुस्तीची मागणी झाली. अंदाजपत्रक तयार झाले, पण प्रत्यक्ष काम झालेच नाही. त्यातच भूमिगत गटार योजनेचे काम निघाल्याने आहे तो पूल तोडण्यात आला. त्यामुळे आसपासच्या वसाहतीतील लोक आणि शाळकरी मुलांना नाल्यातूनच ये-जा करावी लागत आहे. कधी एखाद्या लेकराला वसाहतीतील रहिवाशाला धोका होईल हे सांगता येत नाही. जेव्हा शाळकरी मुले त्यातून जाताना आपण पाहतो तेव्हा याची कल्पना येते.
सिडको एन-२ मुकुंदवाडी ते संतोषीमातानगरदरम्यान असलेल्या नाल्यावर एक पूल बांधण्यात आला होता. यासाठी जवळपास १० लाख रुपये खर्च करण्यात आला होता. फक्त पादचारी आणि हलक्या वाहनांसाठी उभारलेल्या या पुलावरून जड वाहनांची वर्दळ सुरू झाल्याने चार-दोन वर्षांतच पूल खिळखिळा झाला. त्याला भगदाडे पडली. त्यावर डीबी स्टारने वृत्तही प्रसिद्ध केले. यंत्रणा हलली. ३५ लाखांचे अंदाजपत्रक तयार केले. पण काम झाले नाही. त्यात मध्यंतरी भूमिगत गटार योजनेसाठी हा पूलच काढण्यात आला. पण आता तो पुन्हा बांधण्यासाठी कुणीही प्रयत्न करत नाही.
अन्यथा पुन्हा फेरनिविदा काढू
ठेकेदाराने आजच आम्हाला डीएसआरमध्ये ३५ टक्क्यांनी वाढ करण्याबाबत पत्र दिले आहे. आमचा त्यास नकार आहे. निदान २० टक्के वाढ देण्यास अाम्ही तयार आहोत. ठेकेदार राजी झाला तर काम करणार अन्यथा पुन्हा फेरनिविदा काढू -बी.के. परदेशी, सहायकअभियंता

मनपा उदासीन
दीडवर्षा पासू नया पुलाचे बांधकाम व्हावे म्हणून प्रयत्न करत आहे. पण महापालिका प्रशासन बांधकामाबाबत उदासीन आहे. तत्कालीन आयुक्तांनी पाहणी करून आदेश दिले होते. आत्ताचे आयुक्त विषयावर बोलायलाही तयार नाहीत. -भाऊसाहेबजगताप, नगरसेवक

ठेकेदार मागतोय दरवाढ : ठेकेदारएम. ए. सिद्दीकी यांनी २०१२ च्या अंदाजपत्रकातील डीएसआर नुसार काम करण्यास नकार दिला आहे. त्याऊलट त्यानेच मनपाला ३५ टक्के दराने या पुलाच्या बांधकामाच्या किमतीत वाढ करण्याची मागणी केली आहे. पानवर
बातम्या आणखी आहेत...