आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऐतिहासिक दरवाजेही घेतील मोकळा श्वास, पालकमंत्री रामदास कदम यांनी दिली ग्वाही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - पालकमंत्री रामदास कदम यांच्या हस्ते बुधवारी कटकट दरवाजाला लागून होणाऱ्या पुलाचे भूमिपूजन करण्यात आले. यासाठी दोन कोटी रुपये खर्च येणार आहे. येथील पुलाचे काम सुरू होतानाच येत्या दोन महिन्यांत शहरातील अन्य तीन ऐतिहासिक दरवाजांसाठी निधी देण्यात येईल अन् त्याचेही काम सुरू होईल, अशी ग्वाही कदम यांनी दिली.
मकई दरवाजा, बारापुल्ला दरवाजा आणि महेमूद दरवाजा या तीन दरवाजांचा विकास करण्यासाठी सहा वर्षांपूर्वी तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारा कोटी रुपये देण्याची घोषणा केली होती. परंतु प्रत्यक्षात काहीच होऊ शकले नाही. आमदार इम्तियाज जलील यांनी कटकट दरवाजासाठी प्रयत्न सुरू केले. या दरवाजाच्या दोन्ही बाजूंनी पूल तयार केला जाईल. असेच नियोजन अन्य तीन दरवाजांबाबत करण्यात आले होते. परंतु ते होऊ शकले नाही.
कटकट दरवाजा येथील पुलाचे भूमिपूजन करताना पालकमंत्री कदम यांनी आता पुढील तिन्ही दरवाजांना लागून पूल तयार करण्याचे काम तातडीने हाती घेतले जाईल, असे स्पष्ट केले आहे. यासाठी मला एक महिन्याचा अवधी द्या, मी त्या कामांच्या भूमिपूजनासाठी येणार अशी घोषणा केली. ‘माझ्या उंचीवर जाऊ नका. मी काय उंचीची कामे करतो ते बघा,’ असे सांगण्यास ते विसरले नाहीत. कटकट दरवाजासह अन्य तिन्ही दरवाजे हे मध्यचे आमदार इम्तियाज यांच्या मतदारसंघात येतात हे विशेष.

दमडीमहल ते जालना रोड हेही लक्ष्य : दरम्यान,आपल्या भाषणात आमदार इम्तियाज जलील यांनी दमडी महल ते जालना रोड या रस्त्याच्या रुंदीकरणाचाही मुद्दा मांडला. केवळ दहा टक्के लोकांनी विरोध केल्याने हे काम थांबले आहे. ते तातडीने सुरू करावे, अशी विनंती आयुक्तांनी केली. इम्तियाज यांची पाठपुराव्याची पद्धत लक्षात घेता येत्या काही दिवसांत या रस्त्याचे रुंदीकरण होऊ शकते, असे संकेत प्रशासनाने दिले आहेत.

{मकई दरवाजा
घाटीलालागून
{बारापुल्लादरवाजा
मिलकॉर्नर
{महेमूददरवाजा
पाणचक्कीलालागून
बातम्या आणखी आहेत...