आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्यवसायातील भागीदारी तोडल्यामुळे महिलेचे बनावट फेसबुक अकाउंट उघडले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - व्यवसायातील भागीदारी तुटल्यानंतर महिलेची बदनामी करण्यासाठी तिच्या नावावर बनावट फेसबुक अकाउंट उघडणाऱ्या गुन्हेगारास सायबर सेलच्या पथकाने गुरुवारी रात्री गजाआड केले. शेख रशीद अहेमद ( ३०, रा. आरेफ कॉलनी) असे त्याचे नाव आहे. बेगमपुरा ठाण्यात आठ दिवसांपूर्वी विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रशीद आणि ३५ वर्षीय महिलेची व्यवसायात भागीदारी होती. दोघांनी मिळून शहरात बुटीक थाटले होते. 

मात्र या दोघांमध्ये काही कारणांमुळे वाद झाला. त्यानंतर या महिलेने रशीद सोबतची भागीदारी सोडली. रशीदने बदला घेण्यासाठी ही उठाठेव केली. फेसबुक अकाउंटवर महिलेचा फोटो टाकून तिचा तिच्या पतीचा नंबरही दिला. एवढेच नाहीतर अश्लील संदेश पाठवले. त्यामुळे महिलेच्या मोबाइलवर अज्ञात लोकांचे काॅल येऊ लागले. या जोडप्यांनी पोलिस आयुक्तांची भेट घेतली असता, त्यांनी तपास सायबर शाखेकडे दिला. पथकाने अकाउंटची चौकशी केली. फेसबुक कंपनीकडून माहिती मागवली असता हा प्रकार समोर आला. पोलिसांनी रशीदला अटक केली असून तो उच्चशिक्षित आहे. पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर, सहायक पोलिस निरीक्षक उन्मेष थिटे, उपनिरीक्षक हेमंत तोडकर यांनी ही कारवाई केली. 
बातम्या आणखी आहेत...