आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेतू केंद्रासमोर दलालांत फ्रीस्टाइल, ग्राहक पळवल्याच्या कारणावरून घडला प्रकार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - सेतूसुविधा केंद्रात दलाल अजिबात नाहीत, असा दावा प्रशासनाच्या वतीने वेळोवेळी करण्यात येतो; परंतु प्रत्यक्षात येथे दलाल कार्यरत असल्याचे दोन दलालांतील भांडणातूनच समोर आले आहे. शुक्रवारी दुपारी वाजता "माझा माणूस तू का पळवला' या कारणावरून या दलालांत कर्मचारी आणि नागरिकांसह अर्धा तास झोंबाझोंबी आणि हाणामारी झाली. भांडण सुटल्यानंतर पोलिस हजर झाले, तेव्हा दलाल मात्र गायब झाले होते.
जिल्हाधिकारी कार्यालयात वेगवेगळी प्रमाणपत्रे काढण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना दलाल जिल्हाधिकाऱ्यांची मोटार उभी राहते तेथेच गाठतात. या दलालांमध्ये काही महिलांचाही समावेश आहे. प्रमाणपत्र काढण्यासाठी आलेल्या एकाला पहिल्या दलालाने पकडले. काही वेळाने त्याला दुसऱ्याने पळवले. यावरून दोघांत वाद सुरू झाला. नंतर याचे पर्यवसान हाणामारीत झाले. जवळपास अर्धा तास हाणामारी सुरू होती. भांडण सुरू होताच नागरिकांनी तेथून काढता पाय घेतला, तर काहींनी बघ्याची भूमिका घेतली. अधिकाऱ्यांपर्यंत याची माहिती गेल्यानंतर पोलिसांना बोलावले गेले. पोलिस अर्ध्या तासाने दाखल झाले; पण तोपर्यंत दलाल पसार झाले होते.