आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Brokers Taking Advantage Of Police Commissioner Orders Discovered The Spoil Of Your Enemies Route

पोलिस आयुक्तांच्या आदेशाचा फायदा घेत दलालांनी शोधला लुटीचा मार्ग

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - रात्री उशिरापर्यंत व्यवसाय सुरू ठेवणाऱ्या हॉटेलचालकांना शिस्त लावण्यासाठी पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी परवान्याची सक्ती केली. त्याचा फायदा घेत आयुक्तालयातच सक्रिय झालेल्या दलालांनी लुटीचा नवा मार्ग शोधला आहे. हॉटेलचालकांना परवान्यासाठीची आवश्यक असलेली १० प्रमाणपत्रे नसली तरी परवाना घरपोच देण्याकरिता ते ४० हजार ते एक लाख रुपयांची वसुली करत आहेत. या दलालांसोबत काही पोलिस कर्मचाऱ्यांची हातमिळवणी असल्याचे समोर आले आहे.

रात्री ११ वाजता खाणावळी, बिअर बार आणि रेस्टॉरंट आणि हॉटेल बंद झाले पाहिजेत, असा दंडक आहे. तो मोडीत काढून बहुतांश व्यवसाय सुरू होते. त्यांना पोलिस ठाण्यांच्या कर्मचाऱ्यांचे खास संरक्षणही मिळत होते. ही बाब लक्षात आल्यावर पोलिस आयुक्तांनी १९ जून रोजी अनेक बिअर बार, हॉटेल्सवर छापे टाकण्याचे आदेश दिले. मद्य पिण्याचा परवाना नसतानाही मद्यप्राशन करणाऱ्यांवर दंडाची कारवाई झाली. हॉटेल, बारचालकांना नोटिसा बजावण्यात आल्या. त्यानंतर आयुक्तांनी त्यांची एक बैठकही घेतली. त्यात पोलिस परवाना जेमतेम दहा टक्के बिअर बार, हॉटेलचालकांकडे असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे १५ दिवसांत पोलिस परवाना घ्यावा, असे आदेश अमितेशकुमार यांनी दिले.


अग्निशमनयंत्र ते१५ हजार
विभाग शासकीय शुल्क प्रत्यक्ष खर्च
मनपाआरोग्य २५०रुपये ३५०० रुपये
वाहतूकपोलिस शुल्कनाही २० हजार
विद्युतनिरीक्षक शुल्कनाही ५००० रुपये

हॉटेलचालकांना प्रमाणपत्रे मिळवण्यासाठी आलेला खर्च
१. मनपाआरोग्य विभागाचे ना रहकत प्रमाणपत्र
२.शॉपअॅक्ट लायसन्स
३.हॉटेलचानकाशा
४.विद्युतनिरीक्षकाचे ना हरकत प्रमाणपत्र
५.बांधकामपूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र
६.अन्न-औषधप्रशासनाचे ना हरकत प्रमाणपत्र
७.अग्निशमनविभागाचे ना हरकत प्रमाणपत्र,
८.जागावापराचे हमीपत्र
९.व्यावसायिकआणि बिगरशेती परवाना.
१०.वाहतूकशाखेचे ना हरकत प्रमाणपत्र आवश्यक नसले तरी त्याची मागणी पोलिस करत आहेत.

हे एकही प्रमाणपत्र नसले तरी दहा दिवसांच्या आत परवाना मिळवून देण्याची हमी दलाल घेत आहेत. एकूण रकमेतील पाच ते दहा हजार रुपये स्थानिक वाहतूक विभाग आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना द्यावे लागतात, अशीही पुस्ती दलाल जोडत आहेत.

खातरजमा करून घेतली
दलालसक्रिय झाल्याची माहिती काही हॉटेलचालकांनी दिल्यावर ‘दिव्य मराठी’ प्रतिनिधीने त्याची खातरजमा करून घेतली. सदर प्रतिनिधी स्वत: एका हॉटेलचालकासोबत विविध कार्यालयात फिरला तेव्हा प्रमाणपत्राशी संबंधित असलेल्या तेथील कर्मचाऱ्यांनी दलालामार्फत का आला नाहीत, अशी विचारणा केली. शिवाय तुमची एवढी कमाई आहे तर चार-पाच हजार खर्च केल्यास एकही चक्कर मारता परवाना देऊन टाकू, असेही बिनदिक्कतपणे सांगितले.

- प्रमाणपत्रे मिळवून देणारे दलाल नेमके कसा व्यवहार करतात हे जाणून घेण्यासाठी एका दलालाशी ‘दिव्य मराठी’ प्रतिनिधीने संपर्क साधला. त्याच्याशी झालेला संवाद.
प्रतिनिधी : माझ्यामित्राने तुमचे नाव सुचवले. मला पोलिस परवाना मिळेल?
दलाल: हो,मिळेल ना. हॉटेलचे नाव काय, टेबल किती, रोजचा गल्ला किती ?
प्रतिनिधी: श्री भोजनालय. १० ते १२ टेबल आहेत. रोजचा गल्ला हजारांचा.
दलाल: तुमच्याकडेकोणती प्रमाणपत्रे आहेत?
प्रतिनिधी: शॉप अॅक्ट, फूड अँड ड्रग्ज
दलाल: अहो,अजून खूप प्रमाणपत्रे लागतात. त्यासाठी किमान दीड लाख रुपये लागतील.
प्रतिनिधी: बाप रे! माझ्याकडे एवढे पैसे नाहीत हो. दुसरा काही मार्ग नाही का?
दलाल: ओके.ओके. काळजी करू नका. तुमच्याकडे आहे त्या प्रमाणपत्रावर मी तुम्हाला पोलिस परवाना मिळवून देईन. त्यासाठी किमान चाळीस हजार खर्च येईल. लोकांचे काम मी ६० हजारपेक्षा कमी करत नाही. मात्र, तुमचा गल्ला कमी आहे म्हणून मदत करतो.
प्रतिनिधी: नाही होत. थोडेफार कमी करा. पण काही अडचण तर येणार नाही ना?
दलाल: काहीकाळजी करू नका. पोलिस तुमच्या हॉटेलवर येणार नाहीत ही माझी गॅरंटी. पण फोनवर बोलण्यापेक्षा आपण प्रत्यक्ष भेटू. उद्या सीपी ऑफिसच्या गेटवर येऊन मला फोन करा.