आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भावानेच केला बहिणीवर बलात्कार, मुकुंदवाडी ठाण्यात झीरोने गुन्हा दाखल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- चुलत भावाने बहिणीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. मालेगाव येथे ही घटना घडली असून मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात २१ नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलगी १५ वर्षांची असून भावाबहिणीच्या नात्याला काळिमा फासणारा नराधम २५ वर्षांचा आहे. अमोल असे त्याचे नाव असून पुढील तपासासाठी हा गुन्हा मालेगाव पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.

पीडित मुलीच्या आई-वडिलांचे निधन झालेले आहे. त्यामुळे मामांनी तिचा सांभाळ केला. पुढील शिक्षणासाठी तिला जानेवारी २०१५ मध्ये मालेगाव येथे काकाकडे पाठवण्यात आले होते. घरातच राहणारा मोठा चुलत भाऊ अमोलने तिच्या रूममध्ये प्रवेश करत तिच्यावर अत्याचार केला. पाच महिन्यांत त्याने तिच्यावर अनेकदा अत्याचार केला. याची वाच्चता केल्यास तुला मारून टाकीन, अशी धमकीही दिली. त्यानंतर तिची तब्येत खराब झाल्यामुळे चुलतीने तिला एकटीला बसमध्ये बसून औरंगाबादला पाठवून दिले.
पुढील स्‍लाइडवर वाचा उर्वरीत माहिती....