आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

घट विसर्जनासाठी गेलेल्या बहीण-भावाचा तलावात बुडून मृत्यू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - सर्वत्रमोठ्या आनंदाने दसरा साजरा होत असताना मंगळवारी परदरी तांड्यावर मात्र आक्रोश ऐकू येत होता. नऊ दिवस देवीचे बसवलेले घट विसर्जित करण्यासाठी गेलेल्या बहीण-भावाचा तलावात बुडून करुण अंत झाला. या दोघांनाही वाचवण्यासाठी तलावात उडी घेतलेल्या मोठ्या बहिणीची प्रकृती चिंताजनक असून तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची नोंद चिकलठाणा पोलिसात करण्यात आली आहे.
दिशा सुभाष राठोड (१६) हृतिक रावसाहेब राठोड (९) अशी मृतांची नावे आहेत, तर दोघांना वाचवण्यासाठी गेलेल्या पूजा रावसाहेब राठोड (१७) हिची प्रकृती चिंताजनक असून तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नवरात्रीनिमित्त बसवण्यात आलेल्या घटाचे घरातील मुलींच्या हस्ते नवमी किंवा दसऱ्याच्या दिवशी विसर्जन करण्यात येते. दिशासुद्धा गावातील आपल्या सर्व मैत्रिणींसोबत घट विसर्जित करण्यासाठी तांड्याजवळ असलेल्या तलावावर गेली होती. परंतु लाडक्या बहिणीसोबत हृतिकही हट्टाने गेला हाेता. बहिणी तिच्या मैत्रिणी विसर्जन करण्यात मग्न असताना हृतिक तलावाच्या काठावर खेळत होता. दरम्यान, त्याचा पाय घसरला आणि तो सुमारे ४० फूट खोल तलावात पडला. त्याला बुडताना पाहून दिशाने पूजा सोडून त्याला वाचवण्यासाठी पाण्यात उडी घेतली. त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात दोघेही बुडाले. तलावाजवळ कुणीही मोठी व्यक्ती नसल्याने मैत्रिणींमध्ये आरडाओरड सुरू झाली. तेवढ्यात आपल्या लहान भावंडांना बुडताना पाहिल्यावर त्यांच्या मोठ्या बहिणीनेही पाण्यात उडी टाकली. इतर मुलींची आरडाओरड एेकून गावातील लोकांनी तलावाकडे धाव घेतली आणि तिघांना पाण्यातून बाहेर काढले. परंतु तोपर्यंत उशीर झाला होता. दिशा हृतिकचा अंत झाला होता. पूजाचा श्वास सुरू असून तिला तातडीने एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दिशाने नुकताच अकरावीत प्रवेश घेतला होता, तर हृतिक तिसरीत शिकत होता. याप्रकरणी चिकलठाणा पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
बातम्या आणखी आहेत...