आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीटी कपाशी बियाण्याचे दर शंभर रुपयांनी कमी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - कृषिमंत्री एकनाथ खडसे यांनी बीटी बियाण्याचे दर कमी करणार असल्याचे काही दिवसांपूर्वी सांगितले होते. त्यानुसार प्रती पाकीट १०० रुपये कमी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. ९३० रुपयांचे पाकीट आता ८३० रुपयांना मिळेल. यापेक्षा जास्त दराने कुणी विक्री करताना आढळल्यास त्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश कृषी विभागाला देण्यात आले आहेत. या निर्णयामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे १६० कोटी रुपये वाचणार आहेत. त्याचा फायदा विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांना होणार आहे.
राज्य कृषी विभागाने कपाशी लागवडीसाठी ३३.४३ लाख हेक्टर क्षेत्र प्रस्तावित केले आहे. प्रत्यक्षात ४० लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर कपाशी लागवड होते. हे लक्षात घेऊन कोटी ६० लाख बीटी कपाशी बियाणे पाकिटे कृषी केंद्रावर उपलब्ध करून देण्यात आली आहेत. मराठवाडा, विदर्भात राज्यात सर्वाधिक कापूस पिकवला जातो. मराठवाड्यात ४६ लाख ८७ हजार हेक्टर खरीप क्षेत्रापैकी १७ लाख ६७ हजार ५०० हेक्टर क्षेत्र कपाशीसाठी निर्धारित करण्यात आले आहे. ७७ लाख ७८ हजार कपाशी पाकिटे बाजारात विक्रीसाठी दाखल झाली आहेत. मात्र, कृषिमंत्री खडसे यांनी बियाण्याचे दर अवाजवी असल्याचे सांगून ते कमी करावेत, असा आग्रह धरला होता. शेतकऱ्यांनी खरेदीही थांबवली होती. सरकारने ठोस निर्णय घेतला असून प्रती पाकीट १०० रुपये कमी करण्यात आले आहे, अशी माहिती सूत्राने दिली.
...तर कारवाई
^बीटीबियाणे प्रती पाकीट शंभर रुपये कमी करण्यात आले आहे. त्यासंदर्भातील शासन निर्णयाचे पत्र प्राप्त झाले असून सर्व विभागला माहिती देण्यात आली आहे. शासनाने निश्चित केलेल्या ८३० रुपये दरापेक्षा कुणी जास्त किमतीने बियाणे विक्री करताना आढळल्यास किंवा तक्रार प्राप्त झाल्यास त्या कृषी केंद्र मालकावर कारवाई केली जाईल. पथकांनाही आवश्यक त्या सूचना करून वॉच ठेवण्यास सांगितले आहे. शेतकऱ्यांनी जवळील कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा. पंडितलोणारे, विभागीय अधीक्षक कृषी अधिकारी
कृषी विभागाचे आवाहन
बीटीकॉटन बोलगार्ड एक ७३० प्रती पाकीट, बोलगार्ड दोन ८३० रुपये प्रती पाकीट, संकरीत कापूस पाचशे रुपये प्रती पाकीट काही अडचण असल्यास १८००२३३४००० या क्रमांकारवर संपर्क साधावा, असे आवाहन कृषी सभापती तथा उपाध्यक्ष दिनकर पवार यांनी केले आहे.